डॉ. श्रीधर रघुनाथ लेले
संस्थापक
फोन
( 02364 ) 247521.
पत्ता
डॉ. श्रीम. हेमलता माधव पुरंदरे (लेले) विद्यासंकुल,
मु.पो. मुटाट, ता.देवगड,
जि.सिंधुदुर्ग: पिन 416803
आमच्याविषयी
संस्थेची माहिती
विकसनशील कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्हयातील देवगड तालुक्यातले मुटाट हे एक आडवळणी खेडेगांव. कोकण रेल्वेवरील वैभववाडी स्थानकाच्या आणि रस्त्याने मुंबई गोवा महामार्गाच्या तरेळे…
प्रस्तावना
!! सुस्वागतम !!
सन्माननीय सभासद,देणगीदार,ग्रामस्थ बंधु-भगिनी आणि माजी विद्यार्थी मित्रांनो!
मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या आणि डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलच्या सन २०११-१२ या सुवर्णमहोत्सवी वर्षात साजरा झालेल्या नेत्रदिपक सांगता समारंभानंतर वर्षभरातच मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ आणि डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलच्या वेबसाईटचा शुभारंभ केला होता……….
विशेष
शिक्षणाची निकड व त्याचे महत्व जाणून आज ज्या जागेवर हायस्कूलची मुख्य इमारत उभी आहे ती सुमारे २ एकर २८ गुंठे एवढ्या क्षेत्राची उत्तम पिकाऊ भातशेतीची जमीन, ती जमीन कसण्या-या घाडी आणि साळुंके या शेतकरी कुळांनी व श्री गणूकाका परांजपे आणि प्रभू या मालकांनी स्वखुशीने शाळेच्या इमारतीसाठी दिली.
शालेय वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात हायस्कूलचे हुशार, होतकरु आणि गरीब विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व शिष्यवृत्यां प्रदान करून गौरव केला जातो. तसेच स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शानाचे कार्यक्रम सादर केले जातात .
मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी ‘झेप’ स्मरणिकेत सादर केलेली मंडळाच्या आणि हायस्कूलच्या गेल्या छपन्न वर्षातील वाटचालीची महत्वाची संक्षिप्त माहिती अद्ययावत करुन सर्वांच्या कायम स्मरणात राहावी यासाठी वेबसाईटवर सादर करण्यात आली आहे.