Golden Trust, dedicated for providing Quality Education for the entire Mutat & Surrounding Territory

मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ

Mutat Panchkroshi Shikshan Prasarak Mandal

संचालित
डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल, मुटाट
कै. सौ. जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य (सं.) कनिष्ठ महाविद्यालय,मुटाट
डॉ. श्री. र. लेले हायस्कूलची कै. भाऊसाहेब काळे भागशाळा, मणचे

हायस्कूलची जागा आणि वास्तू

शाळेसाठी जमीन व स्वतंत्र इमारत:

शाळेसाठी स्वतंत्र इमारत बांधण्याचा निर्णय झाल्यानंतर इमारतीसाठी प्रशस्त व गावाच्या मध्यवर्ती ठिकाणच्या जागेची शोधाशोध सुरु झाली. शिक्षणाची निकड व त्याचे महत्व जाणून आज ज्या जागेवर हायस्कूलची मुख्य इमारत उभी आहे ती सुमारे २ एकर २८ गुंठे एवढ्या क्षेत्राची उत्तम पिकाऊ भातशेतीची जमीन, ती जमीन कसण्या-या घाडी आणि साळुंके या शेतकरी कुळांनी व श्री गणूकाका परांजपे आणि प्रभू या मालकांनी स्वखुशीने शाळेच्या इमारतीसाठी दिली. घाडी आणि साळुंके शेतकरी बांधवांचा तसेच जमीनचे मालक श्री गणूकाका परांजपे आणि प्रभू यांचा त्याग मंडळासाठी अनमोल आहे.

मुंबईच्या एका प्रख्यात कंत्राटदारावर बांधकामाची जबाबदारी सोपविण्यात आली.बांधकाम साहित्य, मजूर, यंत्रसामुग्री वगैरे मुंबईहून रवाना झाली. ग्रामस्थांच्या सहकार्याने व श्रमदानाने आणि शहरी तज्ज्ञांच्या सल्ल्याने बांधकामाला सुरुवात झाली व शीघ्र गतीने साधारणत: १९६५ च्या मध्यास २०३ फुट लांब व २८ फुट रुंद या आकाराची सुंदर,टुमदार,पाहताक्षणी जिची भव्यता नजरेत भरुन येईल अशी एक चिरेबंदी इमारत भूखंड भूमापन क्रमांक १११ ब खाते क्रमांक ७०४ येथे दिमाखाने उभी राहिली.

निधी संकलानाच्या दोन मोहिमा मंडळाने काढल्या:

तारीख १४ एप्रिल १९६४ ला चौपाटी जवळील भारतीय विद्याभवनमध्ये संगीत संशयकल्लोळ या संकृत नाटकाचा बहारदार प्रयोग गिरगांवच्या ब्राह्मण सभेने केला. या वेळी एक स्मरणिका प्रकाशित केली.नाटकाची तिकिट विक्री व जाहिरातीमधून खर्च वजा जाता मंडळाला सुमारे रु.४४,०००/- ची रक्कम मिळाली

त्यानंतर पुन्हा एकदा तारीख १७ एप्रिल १९६६ ला स्मरणिका प्रकाशन व संगीतभूषण श्री. राम मराठे यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम झाला.हा कार्यक्रम दादरच्या बालमोहन विद्दा मंदिराच्या हॉलमध्ये विनाशुल्क करण्यात आला. जाहिरातदार, देणगीदार व संगीतप्रेमी मंडळी या समारंभाला बहुसंख्येने आली होती.स्मरणिकेच्या या उपक्रमातून खर्च वजा जाता मंडळाला सुमारे रु.२७,०००/- मिळाले.
जो काही लाखभराचा निधी मंडळाने गोळा केला तो गोळा करण्यात डॉ. श्रीधर रघुनाथ लेले यांचा सिंहाचा वाटा होता.

इमारत निधीसाठी:

श्री. विनायक भिकाजी देसाई – श्री. उमाकांत श्रीरंग देसाई विज्ञानालय
श्री. माणेकलाल प्राणजीवनदास मेहता – श्री. माणेकलाल प्राणजीवनदास मेहता चित्रकलायतन
श्रीमती रमाबाई बोडस – श्री. गजानन जनार्दन आणि श्रीमती रमाबाई बोडस वर्गखोली

१९७० सरकारी अनुदान धोरणांत क्रांतीकारी बदल:

सरकारी अनुदान धोरणांत क्रांतीकारी बदल झाला.मान्यताप्राप्त शिक्षकांच्या पगारासह सर्व रास्त खर्चाचा ९९ टक्के भार सरकारने आपल्या शिरावर घेतला.ग्रामिण भागातील शाळा चालकांची एक मोठी चिंता दूर झाली.

श्री. गणेश अनंत लेले हे बडोदे संस्थानामध्ये मोठ्या अधिकारावर नोकरीला होते. दिनांक २७-२-१९४५ ला केलेल्या व्यवस्थापत्राने त्यांनी आपल्या मिळकतीची वाटणी केली. वारसांच्या अतुलनीय त्यागामुळे मंडळाला एक रकमी रुपये ४१,४९६/- तारीख ८ सप्टेंबर १९७२ ला मिळाले.

या वारसांचे मंडळ अनंत आभारी आहे.
श्रीमती गीता श्रीधर लेले
श्री. अनंत श्रीधर लेले 
डॉ. हेमलता माधव पुरंदरे
श्री. भालचंद्र रामचंद्र लेले
श्री. देवदत्त पुरुषोत्तम लेले
श्री. माधव पुरुषोत्तम लेले 

इमारत निधी

परांजपे ऑटो कास्ट प्रायवेट लिमिटेड या कंपनीतर्फे इमारत निधीसाठी म्हणून रु.२५,०००/- ची शुभारंभाची देणगी त्वरीत दिली.

शिक्षक व शिक्षकेतर सेवकवर्गांची इमारत निधीमध्ये आपलाही अल्पस्वल्प वाटा असावा याची जाणीव ठेवून आपापसात गोळा केलेली रु ५,२२५/- ची रक्कम मंडळाला देणगी म्हणून दिली.

स्मरणिका:

स्मरणिकेतील जाहिरातीव्दारा छपाई खर्च वजा जाता सुमारे ४२,७५५ रुपयांचा बांधकाम निधी गोळा झाला. स्मरणिकेच्या मुखपृष्ठाची सजावट व छपाई श्री हरीष बाळकृष्ण परब यांनी विनामुल्य करुन दिली.