मंडळाने मुटाट परिसरातील विद्यार्थ्यांच्या उच्च माध्यमिक शिक्षणासाठी कनिष्ट महाविद्दयालय सुरु करण्याच्या पर्यायावर विचार सुरु केला. सन २००८ सालच्या पारितोषिक वितरण समारंभाच्यावेळी ग्रामस्थांबरोबर या पर्यायावर सखोल चर्चा झाली. चर्चा विनिमय करताना श्री अच्युतराव राणे यानी कनिष्ट महाविद्दयालय सुरु करण्याच्या प्रस्तावाबद्दल विचारणा केली. घसघशीत देणगी मिळाल्यास कनिष्ट महाविद्दयालय सुरु करावयाचा मंडळाचा विचार असल्याचे कार्याध्यक्ष श्री विश्वासराव पाळेकर यानी सांगितले. श्री अच्युतराव राणे यानी कनिष्ट महाविद्दयालय प्रस्तावाची माहिती मुटाटचे सुपुत्र श्री रावजी शिवराम राणे यांच्या कानावर घातली. श्री रावजी शिवराम राणे उर्फ नाना राणे यांनी कनिष्ट महाविद्यालय विनाअनुदान तत्वावर चालवावे लागणार ही शक्यता गृहित धरुन खर्चाचा बोजा उचलण्याचे मान्य केले आणि विनाविलंब रुपये ११,००,०००(रुपये अकरा लाख) ची भरीव देणगी दिली.