Golden Trust, dedicated for providing Quality Education for the entire Mutat & Surrounding Territory has  celebrated it’s Diamond Jubilee year from May 29,2021 to May 28, 2022.

मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ

Mutat Panchakroshi Shikshan Prasarak Mandal

संचालित
डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल, मुटाट
कै. सौ. जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य (सं.) कनिष्ठ महाविद्यालय,मुटाट
डॉ. श्री. र. लेले हायस्कूलची कै. भाऊसाहेब काळे भागशाळा, मणचे

ठळक घटना

मंडळ जडण घडणीतील महत्वाच्या घटना

  • मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुटाट या संस्थेची स्थापना होऊन सोसायटीज रजिस्ट्रेशन अ‍ॅक्ट खाली (Bom-63-RNR) तसेच बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अ‍ॅक्ट खाली (F-55-Ratnagiri) तारीख २९ में १९६२ रोजी नोंदणी झाली.
  • मंडळ संस्थापक सदस्य:

    डॉ. मोरेश्वर जनार्दन बोडस, डॉ. श्रीधर रघुनाथ लेले, सर्वश्री विष्णु सखाराम मराठे ,सावळाराम जनार्दन परांजपे, जगन्नाथ दामोदर लेले, भिकाजी धोंडो चिरपुटकर, भिकाजी विश्राम घाडी,गोपाळ लक्ष्मण पाळेकर,भालचंद्र चिंतामण लेले, शिवराम वामन लेले, केशव राजबा राणे, अनंत ध्यानबा पाळेकर, श्रीपाद रामकृष्ण लेले,धोंडो नारायण परब, गुंडो सखाराम कांबळे,भिकाजी गणेश सोवनी,रामचंद्र गोविंद पुजारी, दौलत संभाजी राणे, शांताराम सखाराम पाळेकर आणि पांडुरंग केशव पाळेकर.

  • कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हयात देवगड तालुक्यात मुटाट गाव कोकण रेल्वेचे वैभववाडी स्थानक आणि रस्त्याने मुंबई गोवा महामार्गावरील तरेळे स्थानकाच्या पश्चिमेला विजयदूर्गला जाणार्‍या मार्गावर सुमारे ३० किलोमीटर अंतरावर  आहे.

  • सन १९९९ मध्ये मुटाट गावाचे विभाजन होऊन वारीकवाडी, पाळेकरवाडी आणि माडभाटी या वाड्यांचा मिळून पाळेकरवाडी (लोकवस्ती सुमारे १४००) या गावाची शासकीय निर्मिती झाली.त्यामुळे मुटाट गावाचे आता दोन गांव झाले आहेत.मंडळाच्या शैक्षणिक उपक्रमांचा आता मुटाट,पाळेकरवाडी,मणचे,वाघोटण आणि सडेवाघोटण या गावांतील  विध्यार्थ्यांना थेट लाभ होतो.
  • तारीख ११ जून १९६२ पासून मंडळाच्या मुटाट विद्यामंदिर मुटाट या शाळेत एकूण २९ विद्यार्थी-विद्यार्थीनींसह इयत्ता ८वी चा एक वर्ग सुरु झाला. त्या नंतर पुढील प्रत्येक वर्षी एक इयत्ता अशा क्रमाने, जून १९६५ मध्ये इयत्ता ११ वी चा वर्ग सुरु झाला. मार्च १९६६ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेला मुटाट  विद्या मंदिराची पहिली तुकडी बसली. शालांत परीक्षेला प्रविष्ठ  एकूण विद्यार्थ्यांपैकी ३३.३३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  • सन १९६५ च्या मध्यास २०३ फुट लांब व २८ फुट रुंद आकाराची सुंदर,टुमदार अशी चिरेबंदी इमारत भूखंड भूमापन क्रमांक १११ ब खाते क्रमांक ७०४ येथे दिमाखाने उभी राहिली.
  • इमारत बांधकामासाठी निधी संकलनाच्या दोन मोहिमा मंडळाने काढल्या.तारीख १४ एप्रिल १९६४ ला भारतीय विध्या भवनमध्ये  संगीत संशयकल्लोळम या संस्कृत नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. नाटकाची तिकिट विक्री आणि स्मरणिका प्रकाशनातून मंडळास सुमारे रु.४४,०००/- ची रक्कम मिळाली.
  • दिनांक १७ एप्रिल १९६६ रोजी स्मरणिका प्रकाशन आणि श्री राम मराठे यांचा गायनाचा कार्यक्रम दादरच्या बालमोहन विद्यामंदिरात करण्यात आला. या कार्यक्रमातून मंडळाला सुमारे रु.२७,०००/-मिळाले.
  • तारीख १९ जुलै १९६५ पासून नवीन इमारतीत मुटाट विद्दया मंदिराचे वर्ग भरु लागले. मंडळाच्या वाटचालीतील ही एक ऐतिहासिक घटना आहे.
  • दिनांक १ मार्च १९६९ रोजी महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री माननीय श्री.पुरुषोत्तम गणेश खेर यांच्या शुभ हस्ते हायस्कूल इमारतीमधील काही वर्गकक्षांचे : श्री.उमाकांत श्रीरंग देसाई विज्ञानालय, श्री.माणेकलाल प्राणजीवनदास मेहता चित्रकलायतन, श्री.गजानन जनार्दन आणि श्रीमती रमाबाई बोडस वर्गखोली असे नामकरण झाले.
  • मंडळाचे प्रमुख संस्थापक व अध्यक्ष डॉ.श्रीधर रघुनाथ लेले यांचे दिनांक २० एप्रिल १९६९ रोजी आकस्मिक निधन झाले.
  • श्री भिकाजी धोंडो उर्फ बाबासाहेब चिरपुटकर यांनी मंडळाची धुरा सांभाळली.डॉक्टरांचे परमस्नेही नामदार श्री.पुरुषोत्तम गणेश खेर यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारली. 
  • रविवार दिनांक १९ एप्रिल १९७० रोजी कै.डॉ.श्रीधर रघुनाथ लेले यांना जाहीर आदरांजली वाहण्यात येऊन त्यांच्या जीवनांतील विविध पैलुंचे दर्शन घडविणारा स्मृतिपूजा विशेषांक सौ.ताराबाई पुरुषोत्तम खेर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.
  • संस्थेचा कार्यालयीन कारभार मुंबईहून होऊ लागल्याने रजिर्स्टर्ड ऑफिस मुटाटहून मुंबईला हलविण्यात आले. बृहन्मुंबई विभागाच्या धर्मादाय आयुक्तांच्या कचेरीत मूळची नोंदणी वर्ग करण्यात आली. नवा क्रमांक F-2046 (Bombay) असा आहे.
  • श्री.गणेश अनंत लेले (डॉक्टरांचे चुलते) यांचे वारस श्रीमती गीता श्रीधर लेले,श्री.अनंत श्रीधर लेले, डॉ.हेमलता माधव पुरंदरे,  श्री.भालचंद्र रामचंद्र लेले, श्री.देवदत्त पुरुषोत्तम लेले व श्री.माधव पुरुषोत्तम लेले यांच्या त्यागामुळे मंडळाला एक रकमी रुपये ४१,४९६/- मिळाले. श्री.भि.धो.उर्फ बाबासाहेब चिरपुटकर यांनी या कामी अविश्रांत परिश्रम घेतले.
  • मुटाट विद्यामंदिराला डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल असे नांव देण्याचा ठराव मंडळाच्या तारीख २७ मे १९७३ रोजी भरलेल्या जादा सर्वसाधारण सभेने सर्वानुमते मंजूर केला.
  • डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल असे नांव नामकरण  करण्याचा जाहीर समारंभ तारीख १ मार्च १९७५ रोजी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माननीय श्री.भाईसाहेब सावंत (माजी आरोग्य मंत्रि महाराष्ट्र राज्य) यांचे हस्ते पार पडला.अध्यक्षस्थानी मुटाटचे थोर विद्वान डॉ.वामन केशव लेले M.A.Ph.D. हे होते.
  • तारीख ८ नोव्हेंबर १९७५ रोजी श्री भिकाजी धोंडो चिरपुटकर ऊर्फ बाबासाहेब चिरपुटकरांचे निधन झाले.
  • सन १९७५-७६ पासून कार्यकारी समितीचे जेष्ठ सभासद श्री मनोहर गोविंद लेले यांनी श्री कृष्णाजी विठ्ठल लेले, श्री विष्णु सखाराम मराठे आणि श्री जगन्नाथ दामोदर लेले यांच्या मदतीने मंडळाच्या कार्याची धुरा सांभाळली.
  • श्री.बाबासाहेब चिरपुटकर त्यांची सेवा व स्मृती प्रेरणादायी व्हावी म्हणून हायस्कूलमधील एका वर्ग खोलीला त्यांचे नाव देण्याचा निर्णय तारीख ३१-१२-१९७८ ला भरलेल्या वार्षिक साधारण सभेने घेतला.
  • तारीख ११-२-१९८० ला पार पडलेल्या समारंभात पुढील तीन वर्ग खोल्यांच्या नामकरण पाट्यांचे अनावरण बेळगांवचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे उद्धोगपती श्री. बाळकृष्ण महादेव गोगटे तथा रावसाहेब गोगटे यांच्या हस्ते करण्यात आले. सुप्रसिध्द कादंबरी लेखिका व रत्नागिरीच्या त्यावेळच्या आमदार सौ.कुसुमताई अभ्यंकर समारंभाच्या अध्यक्षस्थानी होत्या.                                                                                                                                          श्री.पुरुषोत्तम रामचंद्र लेले आणि श्रीमती सुंदराबाई पुरुषोत्तम लेले वर्ग खोली
    श्री.भालचंद्र रामचंद्र लेले वर्ग खोली
    श्री.भिं.धो.चिरपुटकर वर्ग खोली 
  • सरकारी निर्णयाप्रमाणे सन १९७८-७९ या वर्षापासून  पुढे इयत्ता ५ वी ते इयत्ता ७ वी चे तीनही वर्ग हायस्कूलमध्ये भरु लागले.
  • सन १९८३-८४ मध्ये नवीन वर्ग खोल्या बांधण्याचा कार्यकारी समितीने निर्णय घेतला. निधी जमविण्यासाठी  श्री नारायण गणेश परांजपे,कार्यकारी समितीचे उपाध्यक्ष यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला.स्वत:  लाखभराचा निधी जमवून दिला.
  •  निधी जमविण्यासाठी स्मरणिका काढायचे ठरले. स्मरणिकेतील जाहिरातीद्वारा छपाई खर्च वजा जाता सुमारे ४२,७५५ रुपयांचा बांधकाम निधी गोळा झाला.
  • स्मरणिकेच्या मुखपृष्ठाची सजावट व छपाई श्री हरीष बाळकृष्ण परब यांनी विनामुल्य करुन दिली. स्मरणिका प्रकाशनाचा सोहळा दिनांक १५ सप्टेंबर १९८५ रोजी दादरच्या बालमोहन विद्दयामंदिराच्या सभागृहात मंडळाचे अध्यक्ष श्री पु.ग.खेर यांचे अध्यक्षतेखाली डॉ.सुधाकर साने यांचे उपस्थितीत संपन्न झाला.ख्यातनाम गायिका सौ.जयमाला शिलेदार यांच्या सुश्राव्य नाट्यगीत गायनाने कार्यक्रमाची शोभा वाढली. मंडळाचे एक हितचिंतक श्री.य.के.लेले यांच्या सौजन्याने नाट्यगायनाचा कार्यक्रम विनाबिदागी सादर करण्यात आला.
  • विस्तारीत इमारतीचे जाहीर उद्घाटन व नव्या वर्गखोल्यांचे नामकरण करण्यासाठी तारीख १ मार्च १९८६ रोजी हायस्कूलच्या प्रांगणात एक शानदार समारंभ साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान देवगडच्या स.ह.केळकर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. आर. ए. कुळकर्णी यांनी भुषविले होते.श्री. अप्पासाहेब गोगटे व श्री. दादासाहेब राणे हे आजीमाजी आमदार, प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
  • सन १९८७-८८ या मंडळाच्या व डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलचा रौप्य महोत्सवी सोहळा तारीख २८ जानेवारी १९८८ ते ३० जानेवारी १९८८ या कालावधीत शाळेच्या प्रांगणात चैतन्यपूर्ण वातावरणात संपन्न झाला.तीन दिवस चाललेल्या या समारंभ सोहळ्याचे  अध्यक्ष व प्रमुख अतिथी म्हणुन कोल्हापुरचे प्राचार्य म.अ.कुळकर्णी होते. डॉ.दिलीप केशव राणे व डॉ. शरद रंगनाथ लेले या विद्वतजनांचे प्रबोधनपर बोल ऐकण्याची संधी सर्वांना मिळाली. सोहळ्याच्या पहिल्या दिवशी हायस्कूलचे स्नेहसंम्मेलन झाले. रात्रीच्या सत्रात विद्यार्थी-विद्यार्थीनिंचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाले. दुसर्‍या दिवशी सकाळच्या सत्रात काही वर्गखोल्यांचे व प्रवेशद्वाराचे नामकरण अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांचे शुभ हस्ते करण्यात आले.रात्रीच्या कार्यक्रमात श्री सदाशिव रामचंद्र लेले यांनी जादूचे प्रयोग सादर केले तर माजी विद्यार्थी श्री म.वि.गोखले यानी सुरेल आवाजात श्रोत्यांना नाट्यगीते ऐकविली.तिसरे दिवशी सकाळी हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. रात्री मुंबईच्या श्री परशुरामबुवा पांचाळ यांच्या सुमधुर भजनाच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.ग्रामस्थांच्या बरोबरीने कार्यकारी समितीचे मुंबई पुण्याकडील पदाधिकारी व सभासद या रौप्य महोत्सवी सोहळ्याला बहुसंख्येने उपस्थित होते.
  • मंडळाने सन १९८४-८५ या वर्षी डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलची भागशाळा मणचे गावात इयत्ता ८ वी चा वर्ग सुरु करुन केली. सन १९८५-८६ मध्ये ९ वीचा वर्ग आणि १९८६-८७ साली दहावीचा वर्ग अशा क्रमाने तीन वर्गांची भागशाळा ग्रामपंचायतीने तात्पुरती सोय केलेल्या गावांतील श्रीकृष्ण मंदिराच्या धर्मशाळेत भरत होती. भागशाळेसाठी सरपंच श्री. बापूसाहेब गोखले यांनी पुढाकार घेवून विशेष प्रयत्न केले. माजी आमदार श्री अमृतराव राणे ऊर्फ दादासाहेब राणे यांनी या भागशाळेसाठी शिक्षण खात्याकडून त्वरीत परवानगी मिळवून दिली.
  • सन १९९८-९९ या वर्षात मंडळाच्या उद्देशातील – “रत्नागिरी (सिंधुदुर्ग) जिल्हयातील देवगड तालुक्याच्या मुटाट व आसपासच्या भागांतील जनतेच्या आर्थिक, सामाजिक, औद्दोगिक व सांस्कृतिक विकासासाठी व सर्वांगीण उत्कर्षासाठी खटपटी करणे” हा उद्देश धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयाने मंडळाला १९९२-९३ ते १९९७-९८ या सहा वर्षांत रु.९२२४ इतकी रक्कम वर्गणी म्हणून भरायला लावल्याने तसेच वरील उद्देश शिक्षणबाह्य प्रकारातील असल्याने हिशेबतपासनिसांच्या सल्ल्यानुसार व पूर्ण विचारांती मंडळाने हा उद्देश घटनेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.
  • मंडळाच्या विविध सभासद प्रकारांच्या वर्गणीत १९६२ सालापासून वाढ करण्यात आली नव्हती.अनेक सभासदांच्या सूचनेचा सर्वांगाने विचार करुन कार्यकारी समितीने तारीख १ एप्रिल १९९९ पासून सभासद वर्गणीचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला.
  • मणचे भागशाळेसाठी कायमस्वरुपी इमारत बांधण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री. रमेशराव घाटे, कार्याध्यक्ष श्री. विश्वासराव पाळेकर, कार्योपाध्यक्ष श्री. मनोहर लेले आणि श्री. कृष्णाजी विठ्ठल लेले यांनी पुढाकार घेतला.  मणच्यातील मंडळाचे हितचिंतक व  कार्यकर्ते श्री. मोरेश्वर अनंत उर्फ बापुसाहेब गोखले, श्री. अरविंद ठाकुरदेसाई, श्री. प्रभाकर मणचेकर, श्री. मुकुंद ठाकुरदेसाई, श्री.तोरसकर, श्री.गजानन सिताराम मेस्त्री, श्री.मंगेश रहाटे व अन्य ग्रामस्थांच्या सहकार्याने सर्वे नं.१२,पोट हिस्सा नं.६ क्षेत्र ०-१६-४ या सुमारे १६ गुंठे क्षेत्राच्या भूखंडावर मणचे भागशाळेसाठी इमारत बांधण्याचे नक्की केले. जमीन खरेदीसाठी श्रीमती नलिनी केशव गोखले यांचेवतीने रुपये ४०,०००/- देणगीस्वरुपात मंडळास मिळाले.
  • श्री कृष्णाजी विठ्ठल लेले कुटुंबियांची डोंबिवलीतील नातलग आणि मुळ मणचेकर श्रीमती शांता काळे या मंडळाच्या  मदतीसाठी पुढे आल्या.  त्यांनी मुळ मणचेकर  पण मणचे गाव कायमचे सोडून मुंबईस स्थलांतरीत झालेले कै.भिकाजी विठ्ठल काळे उर्फ भाऊसाहेब काळे,संस्थापक समर्थ वॉच कंपनी ठाकुरद्वार, मुंबई यांचे सुपुत्र डॉ.राम काळे व डॉ.घन:श्याम काळे याना मंडळ आणि मणचे भागशाळेविषयीची सर्व माहिती दिली.
  • सर्व काळे कुटुंबीय या उदात्त शैक्षणिक कार्याच्या पूर्ततेसाठी मंडळाच्या पाठिशी उभे राहिले. मणचे येथील नूतन इमारतीस कै.भिकाजी विठ्ठल काळे उर्फ भाऊसाहेब काळे भागशाळा हे नाव देण्याच्या अटीवर एकरकमी रुपये पांच लाखाची  देणगी देण्याचे मान्य केले.
  • अध्यक्ष श्री.रमेश घाटे यांच्या प्रयत्नाने वालचंद ट्रस्ट यांचेकडून घसघशीत २.७५लाख रुपयांची विनाअट देणगी मिळाली.
  • मणचे भागशाळेच्या नूतन इमारत बांधकामाचा शुभारंभ दिनांक १० जानेवारी २००४ रोजी श्री नारायणराव दिवेकर भागीदार समर्थ वॉच कंपनी ठाकुरद्वार मुंबई, अध्यक्ष श्री रमेश घाटे,कार्याध्यक्ष श्री विश्वासराव पाळेकर कार्योपाध्यक्ष श्री मनोहर लेले यांच्या शुभ हस्ते  भूमीपूजन आणि शिलान्यासाचा चिरा बसवून झाला.
  •  दिनांक १२ जून २००५ रोजी डॉ. राम काळे, डॉ.घन:श्याम काळे यांचे शुभ हस्ते भागशाळा इमारतीचा दिमाखादार उद्घघाटन सोहळा झाला.तसेच वर्ग खोल्यांना देणग्या देणार्‍या देणगीदारांच्या हस्ते खोल्यांच्या नामकरन फलकांचे अनावरण करण्यात आले.
  •  मंडळाच्या मालकीच्या हायस्कूल इमारतीचा भूखंड भूमापन क्रमांक १११ ब खाते क्रमांक ७०४ (१.०७ हेक्टर २ आर) तसेच कै.अनंत विठ्ठल लेले यांचेकडून खरेदी केलेला भूखंड सर्वे न.२०२ हिस्सा न. १३ क्षेत्र १५ गुंठे ठिकाण आगार हे दोनही भूखंड शासकीय विलंबामुळे रीतसर मंडळाच्या नावे ७/१२ मध्ये नोंद होऊ शकले नव्हते.कार्यकारी समितीचे माजी खजिनदार व स्थानिक समितीचे कर्तव्यतत्पर सभासद श्री.अच्युत अर्जुन राणे यांनी चिकाटीने केलेल्या प्रयत्नांस यश येऊन या दोन्ही जमिनी निर्विवादपणे मंडळाच्या मालकीच्या झाल्या.
  • सन २००८ सालच्या हायस्कूलच्या पारितोषिक वितरण समारंभाच्यावेळी ग्रामस्थांबरोबरच्या बैठकीत कनिष्ट महाविद्दयालय सुरु  करण्याबद्दल चर्चा झाली.  कनिष्ट महाविद्दयालय विनाअनुदान तत्वावर चालवावे लागणार असल्याने घसघशीत देणगी मिळाल्यास कनिष्ट महाविद्दयालय सुरु करावयाचा मंडळाचा विचार असल्याचे कार्याध्यक्ष श्री विश्वासराव पाळेकर यानी सांगितले. श्री अच्युतराव राणे यानी कनिष्ट महाविद्दयालय प्रस्तावाबद्दलची माहिती मुटाटचे सुपुत्र श्री रावजी शिवराम राणे यांच्या कानावर घातली. श्री रावजी शिवराम राणे उर्फ नाना राणे यांनी मंडळास आश्वासक पाठिंबा दिला.  त्यांनी खर्चाचा बोजा उचलण्याचे मान्य केले आणि विनाविलंब रुपये ११,००,००० (रुपये अकरा लाख) ची भरीव देणगी दिली. 
  • शैक्षणिक वर्ष २००९-१० पासून मुटाट येथे कै.सौ.जानकी शिवराम राणे कनिष्ट महाविद्दालयाच्या ( प्रस्तावित) विनाअनुदानीत वाणिज्य शाखेचा ११ वीचा वर्ग सुरु करुन शुभारंभ केला. कनिष्ट महाविद्दयालयास शासन मान्यता मिळेल अशी खात्री होती. परंतु प्रयत्न करुनही शासकीय धोरणांमुळे मान्यता मिळू शकली नाही. इयत्ता अकरावी वाणिज्यचा वर्ग २००९-१० या वर्षी चालवून इयत्ता बारावीसाठी २०१०-११ मध्ये फणसगांव शिक्षणसंस्थेमार्फत विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेला बसविले.
  • मुटाटला कनिष्ट महाविद्दयालयासाठी इमारत, संगणक प्रशिक्षण, तांत्रिक अभ्यासक्रम, हायस्कूलची वाढती विद्दयार्थी संख्या आणि भविष्यातील वाढ विचारात घेऊन हायस्कूल इमारतीला जोडून आठ खोल्यांची एक मजली इमारत बांधण्याचे ठरले. प्रस्तावित इमारतीच्या आराखडयाच्या शासकीय मान्यतेनंतर रविवार दिनांक ४ जानेवारी २००९ रोजी मंडळाचे अध्यक्ष श्री. रमेशराव घाटे , कार्याध्यक्ष श्री. विश्वासराव पाळेकर, उपाध्यक्ष श्री. मनोहरपंत लेले यांचे उपस्थितीत विश्वस्त व उपाध्यक्ष श्री. विष्णु सखाराम मराठे व मुख्य कार्यवाह श्री. जगन्नाथ दामोदर लेले यांचे शुभहस्ते भूमीपूजनाचा सोहळा पार पडला.
  • दिनांक २७ दिसेंबर २००९ या शुभ दिवशी सकाळी ९ वाजता श्री रावजी शिवराम राणे उर्फ नाना राणे,अध्यक्ष श्री रमेश घाटे,कार्याध्यक्ष श्री विश्वासराव पाळेकर, उपाध्यक्ष श्री मनोहर लेले यांचे शुभहस्ते कोनशिला बसविण्यात येऊन कनिष्ठ महाविद्दयालय इमारत बांधकामाचा शुभारंभ झाला. देवगड पंचायत समिती सदस्य श्री बाळकृष्ण पाळेकर आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य श्री जनार्दन तेली यांची खास उपस्थिती या कार्यक्रमास लाभली.,
  • कनिष्ट महाविद्दयालय इमारत बांधकामास श्री मनोहर गोविंद लेले आणि कुटुंबीय, श्री रमेश अच्युत घाटे आणि कुटुंबीय, श्री यशवंत केशव लेले, श्री विनायक कृष्णाजी लेले आणि कुटुंबीय, सौ सुशीला व श्री नारायण गणेश परांजपे आणि कुटुंबीय, श्री बळवंत शिवराम राणे आणि कुटुंबीय, श्री विवेक विष्णु केळकर आणि कुटुंबीय, श्री अभिजित राणे मित्रमंडळ आणि माजी विद्यार्थी संघ यांचेकडून देणग्या प्राप्त झाल्या. कनिष्ट महाविद्दयालय इमारत (खर्च सुमारे २८ लाख रुपये) मार्च २०१२ अखेर पूर्ण झाली.
  • सन २०११-१२ या सुवर्णमहोत्सवी वर्षात कनिष्ट महाविद्दयालय इमारतीचे उर्वरीत बांधकाम, परिसर कंपाऊंड बांधणे, रंगमंचाचे निर्माण आणि हायस्कूल संकुलास व नूतन इमारतीस नांव देण्याच्या उद्देश्यासाठी देणग्या जमविण्यात आल्या. प्रमुख देणग्या अशा: डॉ. हेमलता माधव पुरंदरे यांचेकडुन विद्दयानगरी संकुलाच्या नामकरणासाठी देणगी जाहीर. कै. भाऊसाहेब काळे भागशाळेच्या पोषण आहार खोलीसाठी श्रीमती शांता काळे यांचेकडून  देणगी मिळाली.
  • सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ दिनांक मे ते मे २०१२ : सुवर्ण क्षणांचे  वृत्तांकन
  • मंडळाचा आणि हायस्कूलचा सुवर्णमहोत्सवी वाटचालीचा दिमाखदार सोहळा महोत्सव दिनांक २ मे २०१२ ते ४ मे २०१२ या तीन दिवसात उत्साहाने पार पडला.मंडळाच्या वाटचालीतील महत्वाचा मैलाचा दगड आणि कार्यपूर्तीचा ठळक टप्पा अशी या दिमाखदार सोहळ्याची सुवर्णाक्षरात नोंद व्हावी असे दृष्ट लागण्यासारखे सुनियोजित आयोजन करण्यात आले होते.वर्षभर चालू असलेल्या विविध उपक्रमांच्या आयोजनासह सुवर्ण महोत्सवाची सुनियोजित आखणी आणि सादरीकरणाचे इंद्रधनुष्य सुवर्णमहोत्सव समितीने लिलया पेलले याबद्दल सुवर्ण महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी आणि सभासदांचे अभिनंदन आणि मन:पूर्वक आभार. 
  • सुवर्ण महोत्सव सांगता समारोह शुभारंभदिवस पहिला: बुधवार दिनांक मे २०१२:
  • सुवर्णमहोत्सवी सांगता सोहळ्याच्या प्रथम दिवसाच्या कार्यक्रमाची शुभ सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन देवी सरस्वती व डॉ. श्री. र. लेले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. मा. श्री रमेशराव घाटे हे अध्यक्षस्थानी होते.
  • प्रमुख पाहुण्या मा.साहित्यिका सौ. वृंदा कांबळी यांचे हस्ते मंडळाच्या झेप या सुवर्ण महोत्सवी स्मरणिकेच्या प्रकाशनाचा सोहळा पार पडला.
  • या समारंभाचे औचित्य साधून मंडळाच्या कामकाजात महत्वाचे योगदान देऊन भरीव कार्य करणारे श्री दादा मराठे, श्री ज.दा.लेले, डॉ.हेमलता पुरंदरे, श्री बापुसाहेब गोखले, श्रीमती शांता काळे या मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.मा. श्री कृ.वि.लेले व मा. श्री मनोहर लेले यांचा सत्कार मुंबईत कार्यकारी मंडळाच्या सभेत करण्याचे ठरले.
  • हायस्कूलच्या प्रथम बॅचचे विद्यार्थी सवर्श्री रघुनाथ पाळेकर, जयंत परांजपे,भगवान पाळेकर,सुभाष परांजपे,मधुकर तेली यांचा ह्रद्य सत्कार करण्यात आला. तसेच माजी मुख्याध्यापक श्री सी.रा.प्रभूदेसाई व माजी शिक्षक श्री जगन्नाथ तु.बांडे यांचाही सत्कार करण्यात आला.
  • डॉ.हेमलता माधव पुरंदरे(लेले)विद्दासंकुलाच्या नामफलकाचे श्री मधुकर शंकर तेली यांचे हस्ते अनावरण करण्यात आले.
  • दुपारच्या सत्रात ठीक ४.३० वाजता भाऊसाहेब काळे भागशाळा मणचे येथे मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन देवी सरस्वती, डॉ. श्रीधर रघुनाथ लेले आणि कै. भाऊसाहेब काळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन सुवर्णमहोत्सवी सांगता सोहळ्याची सुरुवात झाली. कै. भाऊसाहेब काळे भागशाळा मणचे येथिल शालेय पोषण आहार खोलीचे उद्घाटन देणगीदार मा.श्रीमती शांता काळे यांचे हस्ते पार पडले.
  • सुवर्णमहोत्सव सांगता समारोह सोहळा दिवस दुसरा : गुरुवार दिनांक मे २०१२:
  • कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागतगीताने झाली.मा.श्री अमृतराव राणे, मा.जनार्दन तेली आणि अन्य मान्यवरांनी दिप प्रज्वलन करुन देवी सरस्वती व डॉ. श्रीधर रघुनाथ लेले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले.
  • कनिष्ट महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मा.श्री अमृतराव राणे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच इमारतीच्या भूमीपूजनाच्या पाटीचे अनावरण श्री रावजी शिवराम राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
  • याच समारोहात पुढीलप्रमाणे आठ वर्गखोल्यांच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
  1. कै.गणेश आप्पजी परांजपे स्मृतीकक्ष-उद्घाटक श्री केशव सुभाष परांजपे/सुभाष परांजपे
  2. कै अच्युत भालचंद्र घाटे व श्रीमती सुमती अच्युत घाटे स्मृतीकक्ष-उद्घाटक डॉ.दिलीप अच्युत घाटे
  3. कै.शिवराम बळवंत राणे स्मृतीकक्ष-उद्घाटक सौ.व श्री मधुकर परब (श्रीमती सुचेता राणे)
  4. कै. गोविंद विष्णु लेले व कै श्रीमती भागीरथी गोविं लेले स्मृतीकक्ष- उद्घाटक श्री मोरेश्वर गोविंद लेले
  5. माजी विद्यार्थी कक्ष- उद्घाटक सर्व माजी विद्यार्थी
  6. कै. केशव बाबुराव लेले स्मृतीकक्ष- उद्घाटक श्री विनायक कृष्णाजी लेले
  7. कै.रत्नाकर शिवराम राणे स्मृतीकक्ष- उद्घाटक श्री अच्युतराव राणे
  8. कै.वि.गो.केळकर व श्रीम.विनिता वि. केळकर स्मृतीकक्ष- उद्घाटक श्री विकास,विवेक,विनय केळकर बंधू
  • सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून प्रमुख देणगीदार सर्वश्री नानासाहेब राणे,बळवंतराव राणे,विनायक लेले,केळकर बंधू,मोरेश्वर लेले,डॉ.दिलीप घाटे, केशव सुभाष परांजपे,तसेच सौ.मीरा पिंपळस्कर यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
  • या कार्यक्रमात सर्वश्री सुरेश रायकर,किरण प्रभू,अच्युतराव राणे,राजेश राणे,जितेंद्र साळुंके,शिवाजी राणे,किशोर प्रभू,बाळकृष्ण पाळेकर,केशव साळुंके,विठोबा प्रभू,रघुवीर लेले,उदय सोवनी,चंद्रकांत घाडी,अमोल पाळेकर,सत्यवान परब,प्रमोद चव्हाण, चंद्रकांत पाळेकरआणि सौ.गीता सोवनी,सरपंच सौ. प्रणाली भेकरे यांचा तसेच मंडळाचे अन्य आजी-माजी सभासद, इतर मान्यवर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सुवर्ण महोत्सवी समिती कार्यकर्ते माजी विद्दयार्थी यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.तसेच श्री धरपणकर सर यांचा खास सत्कार करण्यात आला.
  • सुवर्णमहोत्सव सांगता समारोह सोहळा दिवस तीसरा : शुक्रवार दिनांक मे २०१२:
  • कार्यक्रमाची सुरुवात ठिक १०.०० वाजता सत्यनारायणाच्या महापूजेने झाली. पूजाविधी सुरु असताना ११.०० वाजता फुड फेस्टीवलचे उद्घउटन  मा. श्री रमेशराव घाटे यानी केले. फूड फेस्टीवलमधील पाककृतींचा आस्वाद उपस्थितांनी घेतला. सत्यनारायणाच्या महापूजेनंतर चक्रीभजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सायंकाळच्या सत्रात माजी विद्दयार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. सर्व कार्यक्रम वेळापत्रकाप्रमाणे पार पडल्याने सुवर्णमहोत्सवाची सांगता अत्यंत आनंदाची आणि कायम स्मरणात राहील अशी संस्मरणीय झाली.
  • दिनांक ०३ जानेवारी २०१३ रोजी हायस्कूलचा पारितोषिक वितरण समारंभ आणि स्नेहसम्मेलन पार पडले.
  • उल्लेखनीय उद्देश्यपूर्तीचे यशकनिष्ठ महाविद्दयालयास शासन मंजुरी:
  • शासन निर्णय क्र.स्वयं अ/२०१३/८८५/१३ माशि-१ चे सहपत्रान्वये मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळास यंअर्थसहाय्यित तत्त्वावर शैक्षणिक वर्ष २०१३-१४ पासून मुटाट येथे कला व वाणिज्य कनिष्ट महाविद्याल सुरु करण्यास मंजुरी मिळाली.
  • मंडळाने शैक्षणिक वर्ष २०१३-१४ पासून मुटाट येथे सौ. जानकी शिवराम राणे कनिष्ठ महाविद्दयालय सुरु केले.
  • नूतन कनिष्ठ महाविद्दयालयाच्या औपचारिक उद्घाटनाचा सोहळा दिनांक ३ जुलै २०१३ रोजी माननीय श्री रावजी शिवराम राणे उर्फ श्री नाना राणे यांचे हस्ते आणि कार्याध्यक्ष श्री विश्वासराव पाळेकर यांचे अध्यक्षतेखाली उत्साहाच्या वातावरणात पार पडला. या समारंभास सेवानिवृत्त आयकर सह आयुक्त श्री विजय पांगम यांची सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
  • वर्ष २०१३-१४ मध्ये सुरु झालेल्या इयत्ता ११ वीच्या कला आणि वाणिज्य शाखांच्या प्रथम वर्गाची विद्दयार्थी पटसंख्या ६१ होती.
  • दिनांक २७ डिसेंबर २०१४ रोजी हायस्कूल व कनिष्ठ महाविध्यालयाचा पारितोषिक वितरण समारंभ आणि स्नेहसम्मेलन पार पडले.या पारितोषिक वितरण समारंभात, निवृत्त आयकर सह आयुक्त श्री विजय महादेव पांगम यांचे शुभहस्ते मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या आणि डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलच्या वेबसाईटचा शुभारंभ करण्यात आला Website: www.mpspm.org.
  • डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल-स्वयंअर्थसहाय्यित दर्जावाढ कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्दयालयाच्या विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी-मार्च२०१५ मध्ये पार पडलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत पदार्पणातच ९६.६१ टक्के एवढे नेत्रदिपक यश मिळविले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे पदार्पणातच कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के लागला.
  • दिनांक २९ डिसेंबर २०१५ रोजी मंडळाचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.पारितोषिक वितरण समारंभास अध्यक्ष म्हणून फणसगांव पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री सहदेव नारकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे सुवर्ण कोकणचे संस्थापक श्री सतीश परब यांच्याबरोबर डॉ.राजेंद्र मुंबरकर,श्री सतिशजी जागुष्टे, श्री विजय पांगम, श्री अनंतजी राणे,श्री नरेंद्र पावसकर इत्यादि सन्माननीय पाहुणे आणि सर्वश्री विश्वासराव पाळेकर, शिवाजी राणे, सुभाषचंद्र  परांजपे, अच्युतराव राणे, मुरलीधर राणे, किशोर प्रभू, राजेश राणे, विवेक केळकर आणि रघुनाथ पाळेकर हे कार्यकारी समितीचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते.
  • मंडळाचे आद्य संस्थापक डॉ. श्रीधर रघुनाथ लेले यांच्या अर्ध पुतळ्याची कार्यकारी समिती आणि स्थानिक समितीने दिनांक ३० डिसेंबर २०१५ च्या संयुक्त सभेत स्थापना  करण्याचा निर्णय घेतला. सर्व सहमतीने मध्यवर्ती जागेची निवड करण्यात आली. डॉ.श्रीधर रघुनाथ लेले यांच्या जन्मदिनी दिनांक १ मार्च २०१६ या दिवशी मा. जनार्दन तेली यांचे शुभहस्ते अर्ध पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या ह्रद्य प्रसंगी मोठ्या संख्येने सभासद आणि ग्रामस्थ हजर होते.
  • डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलमध्ये दिनांक 30 डिसेंबर 2015 रोजी पार पडलेल्या संयुक्त सभेत चर्चा केल्यानुसार मंडळाने प्राधान्य कामांसाठी निधी मिळविण्यासाठी खटपट करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार मुख्य कार्यवाह श्री सुभाषचंद्र परांजपे यांनी त्यांचे बंधू श्री धनंजय परांजपे यांच्याद्वारे मेडिकल अँड एज्युकेशन एड अँक्वा बेनोव्हालंट फंड आणि मेडिकल अँड एज्युकेशन एड बृहन्मुंबई बी.एम.एल.पी. असोसिएशन यांचेशी संपर्क साधून मंडळाच्या प्राधान्य कामांना निधी मंजूर करण्याची विनंती (दिनांक 30 डिसेंबर 2015 च्या अर्जाने) केली. मेडिकल अँड एज्युकेशन एड अँक्वा बेनोव्हालंट फंड आणि मेडिकल अँड एज्युकेशन एड बृहन्मुंबई बी.एम.एल.पी. असोसिएशन यांनी मंडळाच्या विनंती अर्जास आश्वासक प्रतिसाद देत मुलींच्या स्वच्छतागृहांच्या बांधकामासाठी आणि ईलेक्ट्रिक फिटिंगसाठी सत्वर पुरेसा निधी मंजूर केला.
  • सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन: मा.खासदार श्री विनायकराव राऊत यांच्या खासदार निधीतून डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलातील सांस्कृतिक भवनास मंजूर झालेल्या निधीतून सांस्कृतिक भवनाच्या पायाभरणाचा भूमिपूजन सोहळा शनिवार दिनांक 19 मार्च 2016 रोजी सायंकाळी 5.30 वाजता  मा.खासदार श्री विनायकराव राऊत यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी मा.साळसकर,श्री जगन्नाथ लेले, श्री शामराव लेले,श्री शिवाजी राणे,श्री प्रकाश भेकरे,श्री विजय चिरपुटकर,श्री सिताराम प्रभू, श्री प्रशांत खरबे, श्री मनोहर तेली, मधुकर घाडी,सरपंच श्री किरण प्रभू यांचेसह मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ आणि पत्रकार उपस्थित होते.
  • स्वच्छतागृहांचा आणि हायस्कूल इमारतीच्या ईलेक्ट्रिक  फिटिंगचा शालार्पण कार्यक्रम: दिनांक 28 मार्च 2016 रोजी सकाळी 9.30 वाजता डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल परिसरात विद्यार्थीनींसाठी बांधलेल्या स्वच्छतागृहांचा, पाणी शुध्दिकरण यंत्राचा आणि हायस्कूल इमारतीच्या ईलेक्ट्रिक  फिटिंगचा शालार्पण सोहळा, देणगीदार संस्था मेडिकल  अँड एज्युकेशन एड अँक्वा बेनोव्हालंट फंड आणि मेडिकल अँड एज्युकेशन एड बृहन्मुंबई, बी.एम.एल.पी. असोसिएशन यांचे मान्यवर प्रतिनिधीं श्री टी व्ही शहा, श्री एस व्ही खोले, श्री भावेश छोटालिया, श्री बिजल शहा, श्री किशोर मर्चंट आणि श्री धनंजय गणेश परांजपे यांच्या हस्ते, मंडळाचे सभासद, आणि ग्रामस्थ बंधु- भगिनींच्या साक्षीने उत्साहात पार पडला.
  • मंडळाच्या दिनांक २० नोव्हेंबर २०१६ रोजी पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेने स्वयंअर्थसहाय्यित दर्जावाढ कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्दयालयाचे कै.सौ.जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य (सं) कनिष्ठ महाविद्यालय,मुटाट असे नामकरण करणारा ठराव पारीत केला. सदर नामकरण ठराव शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या शिफारसीसह मा.शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांच्या मंजुरीसाठी दाखल केला होता त्यास यांनी त्यांच्या पत्र जा.क्र.३/कोवि/क.म.ना.ब/  २०१७ दिनांक २८ ऑगस्ट २०१७ द्वारे मंजुरी दिली.
  • विद्यार्थी स्वच्छतागृहाचे बांधकाम : दिनांक २८ मार्च २०१६ रोजी डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल परिसरात विद्यार्थीनींसाठी बांधलेल्या स्वच्छतागृहाचा शालार्पण सोहळा पार पाडताना, देणगीदार संस्था मेडिकल अँड एज्युकेशन एड अँक्वा बेनोव्हालंट फंड आणि मेडिकल अँड एज्युकेशन एड बृहन्मुंबई, बी.एम.एल.पी. असोसिएशन यांचे वतीने मान्यवर प्रतिनिधीं श्री धनंजय गणेश परांजपे यांनी विद्यार्थी स्वच्छतागृहाचे बांधकामासाठी निधी जाहीर केला होता. बांधकाम पूर्ण झालेल्या विद्यार्थी स्वच्छतागृहांचा मंडळाच्या दिनांक ०६.०१.२०१७ रोजी पार पडलेल्या पारितोषिक वितरण समारंभाच्या मुहुर्तावर सन्माननीय पाहुणे राष्ट्रीय आदर्श शिक्षक पारितोषिक विजेते  श्री पाटील सर यांच्या हस्ते शालार्पण सोहळा सभासद आणि ग्रामस्थ बंधु- भगिनींच्या साक्षीने उत्साहात पार पडला.
  • पोषण आहार किचन शेडचे बांधकामासाठी संस्थेने रु. १लाखाचेवर स्वनिधी खर्च केला असून बांधकाम पूर्ण झाल्याने दिनांक ०६.०१.२०१७  च्या पारितोषिक वितरण समारंभाच्या मुहुर्तावर पोषण आहार किचन शेडचा वापर सुरु करण्यात आला.
  • पारितोषिक वितरण समारंभ आणि स्नेहसंमेलन २०१७: मंडळाचा पारितोषिक वितरण समारंभ आणि डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल, कै.भाऊसाहेब काळे भागशाळा आणि सौ.जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य (सं) कनिष्ठ महाविद्दयालयाचे स्नेहसंमेलन दिनांक २२ व २३ डिसेंबर  २०१७  रोजी पार पडले.पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन मा. प्राचार्य डॉ.आर.डी.बेलेकर आचार्य जावडेकर अध्यापक महाविद्यालय, गारगोटी व संचालक श्री.मौनी विध्यापीठ गारगोटी हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व पालकांसाठी बहुमोल मार्गदर्शन केले.मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विध्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री विश्वासराव पाळेकर यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांस उपाध्यक्ष श्री. धनंजय परांजपे, श्री.शिवाजी राणे कार्यवाह श्री.सुभाषचंद्र परांजपे आणि इतर पदाधिकारी सर्वश्री  रघुनाथ पाळेकर,जितेंद्र साळुंके,डॉ.विनय केळकर, सौ. गीता सोवनी आणि सर्व स्थानिक कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते.
  • दिनांक २३ डिसेंबर  २०१७  रोजी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम आकर्षक पध्दतीने आणि आनंदी वातावरणात सादर केले. स्नेहसंमेलनांस उपस्थितांनी विध्यार्थ्यांचे कौतुक केले.
  • शैक्षणिक वर्ष २०१७/१८ साठी डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलला एस.एस.सी परीक्षा केंद्र म्हणून मान्यता मिळाली.
  • पारितोषिक वितरण समारंभ आणि स्नेहसंमेलन २०१८: दिनांक २६ डिसेंबर २०१८ रोजी मंडळाचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. मंडळाचे अध्यक्ष श्री विश्वासराव पाळेकर पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणुन सौ. व डॉ. घन:शाम भि. काळे उपस्थित होते. त्याचबरोबर  सर्वश्री विजय पांगम आणि अच्युतराव राणे यांची सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. उपाध्यक्ष श्री धनंजय परांजपे, उपाध्यक्ष श्री  शिवाजी राणे, कार्यवाह श्री सुभाषचंद्र  परांजपे, कार्योपाध्यक्ष श्री जितेद्र साळुंके, कोषाध्यक्ष श्री संजय टाकळे, सहकोषाध्यक्ष डॉ.विनय केळकर, सहकार्यवाह श्री रघुनाथ पाळेकर, सल्लागार श्री किशोर प्रभू, सल्लागार श्री बाळकृष्ण पाळेकर यांच्यासह  कार्यकारी समितीचे सभासद सौ. गीता सोवनी आणि श्री अरविंद ठाकुरदेसाई उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना  पारितोषिके आणि शिष्यवृत्त्या देण्यात आल्या. मणचे येथिल मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते श्री बापू गोखले यांच्या कविता वाचनास प्रमुख पाहुण्यांसह सर्वानी दाद दिली.पारितोषिक वितरणानंतर प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांसह सर्वांनी सहभोजनाचा लाभ घेतला.
  • दिनांक २७ डिसेंबर २०१८ रोजी स्नेहसंमेलन कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांच्या आकर्षक सादरीकरणाने आनंदी वातावरणात पार पडला. स्नेहसंमेलनांस उपस्थितांनी विध्यार्थ्यांचे भरभरुन कौतुक केले.
  • शनिवार दिनांक २ फेब्रुवारी २०१९ रोजी डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल परिसरात मा. खासदार विनायकजी राऊत यांच्या खासदार निधीतून बांधलेल्या सांस्कृतिक भवनाचे सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री ना. दिपकभाई केसरकर यांचे शुभ हस्ते  उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्यास अरुण दुधवडकर, इतर मान्यवर, संस्थाचालक आणि ग्रामस्थ उपस्थित   मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • माध्यमिक शालान्त परीक्षा मार्च २०१९- विद्यार्थ्यांचे उज्वल यश : डॉ.श्रीधर रघूनाथ लेले हायस्कूल मुटाट कै.भाऊसाहेब काळे भागशाळा मणचेसह आणि खास बाब म्हणून शिक्षण खात्याच्या मान्यतेने डॉ.श्रीधर रघूनाथ लेले हायस्कूलमधून यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय, बापर्डेसह मार्च २०१९ मध्ये पार पडलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ८९.७० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाचे वैशिष्ट्य  म्हणजे अभ्यासक्रम- परीक्षा निकष बदल यशस्वीपणे आत्मसात करून  विध्यार्थ्यांनी उत्तम यश मिळविण्याची परंपरा कायम राखली आहे. 

  • उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९- विद्यार्थ्यांचे उज्वल यश : स्वयंअर्थसहाय्यित सौ.जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य (सं) कनिष्ठ महाविद्दयालयातील फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये पार पडलेल्या उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेला परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ९३.२४ टक्के विध्यार्थी उत्तीर्ण होऊन त्यांनी नेत्रदिपक यश संपादन केले. उल्लेखनीय बाब म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा निकाल सलग पाचव्यांदा १०० टक्के लागला.

  • स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०१९ समारोह :  मंडळाचे अध्यक्ष श्री  विश्वासराव पाळेकर यांचे हस्ते विधीवत ध्वजारोहन झाले. या प्रसंगी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीगीते आणि शौर्यगीते सादर केली. पारितोषिके आणि शिष्यवृत्त्यांचे वितरण करण्यात आले. स्वातंत्रयदिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या  रानभाज्या आणि औषधी वनस्पतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन अध्यक्ष श्री विश्वासराव पाळेकर यांचे हस्ते करण्यात आले. 
  • मंडळाची ५७ वी (सत्तावन्नावी) वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट २०१९: मंडळाच्या सर्व सभासदांची ५७ वी (सत्तावन्नावी) वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल,मुटाट, ता.देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, ४१६८०३,  येथे  आयोजित करण्यात आली होती. सभेस मंडळाचे एकूण ४० सभासद हजर होते. वार्षिक सर्वसाधारण सभेचे निमित्त साधून आयोजित पर्ण फुले रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन अध्यक्ष श्री विश्वासराव पाळेकर यांनी केले.
  • ४५ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन: दिनांक ३ डिसेंबर २०१९ ते ५ डिसेंबर २०१९ : डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल आणि सौ.जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य (सं) कनिष्ठ महाविद्दयालयात दिनांक ३ डिसेंबर २०१९ ते ५ डिसेंबर २०१९ या कालावधीत देवगड तालुकास्तरीय ४५ वे विज्ञान प्रदर्शन आयोजित  करण्यात आले.
  • दिनांक २७ डिसेंबर २०१९ रोजी मंडळाचा पारितोषिक वितरण  मंडळाचे अध्यक्ष श्री विश्वासराव पाळेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणुन मा. श्री. सदानंद वामन पवार ( उपाध्यक्ष ,देवगड एज्यु. बोर्ड ), सन्माननीय पाहुणे म्हणुन श्री. अशोक मनोहर देसाई,सौ. आकांक्षा अशोक देसाई आणि श्री रमेश रामचंद्र भिडे उपस्थित होते. त्याचबरोबर  सर्वश्री विजय पांगम आणि अच्युतराव राणे या  मान्यवरांची  उपस्थिती लाभली. उपाध्यक्ष श्री धनंजय परांजपे, उपाध्यक्ष श्री  शिवाजी राणे, कार्यवाह श्री सुभाषचंद्र  परांजपे, कार्योपाध्यक्ष श्री जितेद्र साळुंके, सहकोषाध्यक्ष डॉ. विनय केळकर,  सहकार्यवाह श्री रघुनाथ पाळेकर, सल्लागार श्री बाळकृष्ण पाळेकर,डॉ.दिलिप पाळेकर यांच्यासह  कार्यकारी समितीचे सभासद सौ. गीता सोवनी आणि श्री अरविंद ठाकुरदेसाई उपस्थित होते. स्थानिक समिती सदस्य  मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूच्या विद्याथ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली निर्मिलेल्या सुबक व सुंदर अशा संस्कारदीप या हस्तलिखिताचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना  पारितोषिके आणि शिष्यवृत्त्या प्रदान करण्यात आल्या. मणचे येथिल मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते श्री बापू गोखले यांच्या कविता वाचनास प्रमुख पाहुण्यांसह सर्वानी दाद दिली.पारितोषिक वितरणानंतर प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांसह सर्वांनी सहभोजनाचा लाभ घेतला.
  • दिनांक २८ डिसेंबर २०१ रोजी दुपारी स्नेहसंमेलन कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांच्या आकर्षक सादरीकरणाने आनंदी वातावरणात पार पडला. स्नेहसंमेलनांस उपस्थितांनी विध्यार्थ्यांचे भरभरुन कौतुक केले.
  •  प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२० या मुहुर्तावर मंडळाचे उपाध्यक्ष  श्री शिवाजी राणे यांनी उत्तम दर्जाच्या २४ खुर्च्या  देणगी म्हणून दिल्या. तसेच हायस्कूलच्या १९८९/९० बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्यावतीने श्री सुधाकर परांजपे यांनी १०० खुर्च्या देणगी म्हणून दिल्या.
  • संस्था नियुक्त आर्किटेक्ट आणि इंजिनिअर जे.एस.संख्ये यांनी दिनांक 19.03.2020 ला मुटाट आणि मणचेला भेट देवून  मंडळाच्या सर्व इमारतींचा स्ट्रक्चरल रिपोर्ट आणि हायस्कूलच्या मुख्य इमारतीवर पहिला मजला बांधणेसंबंधीचा अहवाल मंडळाकडे सादर केला. आर्किटेक्ट आणि इंजिनिअर जे.एस.संख्ये यांनी सर्व इमारतींची प्रत्यक्ष तपासनी करुन, डागडुजी आणि दुरुस्तीसंबंधीचा तपशीलवार रिपोर्ट दिला आहे. डॉ.श्री.र.लेले हायस्कूल इमारतीवर पहिल्या मजल्याचे बांधकाम करायला कोणताही धोका नसल्याचे मत दिले आहे. 

  •  स्वयंअर्थसहाय्यित कै. सौ. जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य (सं) कनिष्ट महाविद्दयालयाच्या विध्यार्थ्यांनी फेब्रुवारी- मार्च २०२० मध्ये पार पडलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत  ९७.२० टक्के यश मिळविले.

  • माध्यमिक शालान्त परीक्षा मार्च २०२० मध्ये पार पडलेल्या  परीक्षेला बसलेले डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल मुटाट आणि कै.भाऊसाहेब काळे भागशाळा,मणचे येथिल ९८.९७ टक्के विध्यार्थी  उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाले.
  • मंडळाची ५८ वी (अठ्ठावन्नावी) वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता  डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल मुटाट , येथे  आयोजित करण्यात आली होती. सभेस  एकूण २९ सभासद हजर होते.  
  • मंडळाचा  पारितोषिके आणि शिष्यवृत्त्यां वितरणाचा कार्यक्रम  दिनांक २७ फेब्रुवारी २०२१ रोजी पार पडला. कोरोना संसर्गाबाबत सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करुन फक्त पारितोषिके आणि शिष्यवृत्त्या प्राप्त विध्यार्थ्यांना या कार्यक्रमास प्रवेश देण्यात आला होता. भारत सरकारच्या हरित सेनेच्यावतीने देशपातळीवरील ४५ विद्यार्थ्यांमध्ये भविष्यातील निसर्ग शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेल्या पार्थ अनिल परांजपे याचा आणि त्यास मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री अनिल घुगे यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. 

  • सोमवार दिनांक १ मार्च २०२१ रोजी मंडळाचे संस्थापक डॉ.श्रीधर रघुनाथ लेले यांच्या प्रतिमेस आणि अर्धपुतळ्यास जन्मदिनानिमित्त  पुष्पहार अर्पण करण्यात आले. संस्था अध्यक्षांनी डॉक्टरांच्या कार्याचा आढावा घेताना त्यांनी दाखविलेल्या मार्गावर वाटचाल करण्यास मंडळ कटिबध्द आहे असे सांगितले. कोरोना संसर्गाचे सर्व प्रतिबंध पाळून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

  • सन २०२१ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सुधारित मुल्यमापन कार्यपध्दतीनुसार दिनांक १६ जुलै २०२१ रोजी जाहीर झालेल्या सन २०२१ च्या  माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत  डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल मुटाट आणि कै.भाऊसाहेब काळे भागशाळा, मणचे येथिल विद्यार्थ्यांनी,  शंभर टक्के ( १००) यश संपादन केले.
  • श्री मनोहर गोविंद लेले यांचे दु:खद निधन:  हीरक महोत्सवाचे नियोजन चालू असतांना विद्यमान कार्यकारी समिती सदस्य, माजी उपाध्यक्ष, माजी कार्येपाध्यक्ष, जेष्ठ सभासद आणि आधारस्तंभ श्री मनोहर गोविंद लेले  यांचे दिनांक २३ एप्रिल २०२१ रोजी दु:खद निधन झाले. 
  • श्री विष्णु सखाराम मराठे यांचे दु:खद निधन:  हीरक महोत्सवाचे नियोजन चालू असतांना मंडळ संस्थापक सदस्य, आधारस्तंभ, मार्गदर्शक, कार्यकारी समितीचे माजी मुख्य कार्यवाह, माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान विश्वस्त अशी अनेक पदे भूषविलेल्या श्री विष्णु सखाराम मराठे यांचे    शुक्रवार दिनांक २७ ऑगस्ट २०२१ रोजी मुटाट येथे दु:खद निधन  झाले.
  • हीरक महोत्सवी वर्षातील उल्लेखनीय कार्यक्रम: मोफत आरोग्य तपासणी शिबीर:  रविवार दिनांक ०७ नोव्हेंबर २०२१ रोजी डॉ.श्री.र.लेले हायस्कूलमध्ये डॉ.गद्रे आणि सहकार्‍यांच्या मदतीने नवतरुण विकास मंडळाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले.

  • देवगड पंचायत समितीची मासिक सभा: हीरक महोत्सवानिमित्त माननीय सभापती श्री लक्ष्मण (रवी) पाळेकर, हीरक महोत्सव समितीचे उपाध्यक्ष श्री भास्कर पाळेकर आणि माजी पंचयत समिती सदस्य श्री बाळकृष्ण पाळेकर यांच्या सहकार्याने बुधवार दिनांक १७ नोव्हेंबर २०२१  रोजी डॉ. श्री.र.लेले हायस्कूलमध्ये देवगड पंचायत समितीची मासिक सभा पार पडली.

  • मंडळाचा पारितोषिक वितरण समारंभ दिनांक ३० डिसेंबर २०२१:  डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल, कै. भाऊसाहेब काळे भागशाळा आणि कै.सौ.जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा पारितोषिक वितरण समारंभ दिनांक ३० डिसेंबर २०२१ रोजी श्री विश्वासराव पाळेकर यांचे अध्यक्षतेखाली, प्रमुख पाहुणे मा.श्री मोहनराव सावंत, माजी गटशिक्षणाधिकारी, कणकवली आणि उपाध्यक्ष अ.भा.साने गुरुजी कथामाला यांच्या उपस्थितीत उत्साहाने पार पडला. मंडळाचा हीरक महोत्सवी उपक्रम म्हणून कार्यक्रमास उपस्थित, डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलचे नामवंत गुणवान माजी विध्यार्थी सर्वश्री दत्तात्रय सातवळेकर, शेखर परांजपे, डॉ.आदित्य लेले आणि नासीर सोलकर यांचा युवा गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

  • मंडळाची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक ३० डिसेंबर २०२१: कोरोना प्रतिबंधांचे पालन करुन मंडळाची ५९ वी (एकोणसाठावी) वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक ३० डिसेंबर २०२१ रोजी डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल मुटाट , येथे आयोजित करण्यात आली होती.
  •