Golden Trust, dedicated for providing Quality Education for the entire Mutat & Surrounding Territory has  celebrated it’s Diamond Jubilee year from May 29,2021 to May 28, 2022.

मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ

Mutat Panchakroshi Shikshan Prasarak Mandal

संचालित
डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल, मुटाट
कै. सौ. जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य (सं.) कनिष्ठ महाविद्यालय,मुटाट
डॉ. श्री. र. लेले हायस्कूलची कै. भाऊसाहेब काळे भागशाळा, मणचे

हायस्कूलची यशप्राप्ती

शाळेचे यश

महत्वाच्या कार्यक्रमांची नोंद आणि उल्लेखनीय घडामोडी

दिनांक ०३ जानेवारी २०१३ रोजी हायस्कूलचा पारितोषिक वितरण समारंभ आणि स्नेहसम्मेलन पार पडले.

दिनांक २७ डिसेंबर २०१४ रोजी हायस्कूल व कनिष्ठ महाविध्यालयाचा पारितोषिक वितरण समारंभ आणि स्नेहसम्मेलन पार पडले. या पारितोषिक वितरण समारंभात, निवृत्त आयकर सह आयुक्त श्री विजय महादेव पांगम यांचे शुभहस्ते मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या आणि डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलच्या वेबसाईटचा शुभारंभ करण्यात आला Website: www.mpspm.org.

मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी ‘झेप’ स्मरणिकेत सादर केलेली मंडळाच्या आणि हायस्कूलच्या गेल्या पन्नास वर्षातील वाटचालीची महत्वाची संक्षिप्त माहिती अद्ययावत करुन सर्वांच्या कायम स्मरणात राहावी यासाठी वेबसाईटवर सादर करण्यात आली आहे.

सन 2014-15 या वर्षी डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल-स्वयंअर्थसहाय्यित दर्जावाढ कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्दयालयाच्या प्रथम बॅचच्या विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी-मार्च २०१५ मध्ये पार पडलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत पदार्पणात ९६.६१ टक्के एवढे नेत्रदिपक यश मिळविले. या यशाबद्दल मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या तमाम सभासदांच्यावतीने सर्व यशस्वी  विध्यार्थी आणि विध्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

मंडळाने शालेय पोषण आहार खोलीच्या बांधकामाच्या खर्चाची स्वनिधीची तरतूद केली आणि आराखड्याप्रमाणे बांधकाम सुरु होऊन पूर्ण झाले.

दिनांक २९ डिसेंबर २०१५ रोजी मंडळाचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.पारितोषिक वितरण समारंभास अध्यक्ष म्हणून फणसगांव पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री सहदेव नारकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे सुवर्ण कोकणचे संस्थापक श्री सतीश परब यांच्याबरोबर डॉ.राजेंद्र मुंबरकर,श्री सतिशजी जागुष्टे, श्री विजय पांगम, श्री अनंतजी राणे,श्री नरेंद्र पावसकर इत्यादि सन्माननीय पाहुणे आणि सर्वश्री विश्वासराव पाळेकर, शिवाजी राणे, सुभाषचंद्र  परांजपे, अच्युतराव राणे, मुरलीधर राणे, किशोर प्रभू, राजेश राणे, विवेक केळकर आणि रघुनाथ पाळेकर हे कार्यकारी समितीचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके आणि शिष्यवृत्त्या देण्यात आल्या. मणचे येथिल मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते श्री बापू गोखले यांच्या कविता वाचनास प्रमुख पाहुण्यांसह सर्वानी दाद दिली.पारितोषिक वितरणानंतर प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांसाठी सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मंडळाच्या शैक्षणिक विस्तारातील उद्देश्यपूर्तीचे ऊल्लेखनीय यश - कनिष्ठ महाविद्दयालयास शासन मंजुरी

शासन निर्णय क्र.स्वयं अ/2013/885/13 माशि-1 चे सहपत्रान्वये मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळास स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर शैक्षणिक वर्ष 2013-14 पासून  मुटाट येथे कला व वाणिज्य कनिष्ट महाविद्याल सुरु करण्यास मंजुरी मिळाली. मंजुरीनुसार मंडळाने शैक्षणिक वर्ष 2013-14 पासून मुटाट येथे दर्जावाढ कला आणि वाणिज्य (प्रस्तावित नांव: सौ. जानकी शिवराम राणे) कनिष्ठ महाविद्दयालय सुरु केले. नूतन कनिष्ठ महाविद्दयालयाच्या औपचारिक उद्घाटनाचा सोहळा दिनांक 3 जुलै 2013 रोजी माननीय श्री रावजी शिवराम राणे (श्री नाना राणे) यांचे हस्ते, कार्याध्यक्ष श्री विश्वासराव पाळेकर यांचे अध्यक्षतेखाली उत्साहाच्या वातावरणात पार पडला. या उद्घाटन सोहळ्यास निवृत्त आयकर सह आयुक्त श्री विजय महादेव पांगम यांची सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली होती.

डॉ. श्रीधर रघुनाथ लेले यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण

मंडळाचे आद्य संस्थापक डॉ. श्रीधर रघुनाथ लेले यांच्या अर्ध पुतळ्याची विश्वस्त श्री.अनंतराव लेले आणि कार्यकारी समिती सदस्य डॉ. श्रीम. हेमलता पुरंदरे यांच्यासह अनेक ग्रामस्थांची आग्रहाची मागणी होती. सर्वांच्या उस्फूर्त सहभागाने, सर्व सूचनांचा विचार कर कार्यकारी समिती आणि स्थानिक समितीने हायस्कूलमध्ये झालेल्या दिनांक ३०डिसेंबर २०१५ च्या संयुक्त सभेत अर्ध पुतळ्याची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. याच सभेत पुतळा स्थापनेची जागा निश्चित करण्यासाठी सभेपुढे आलेल्या अनेक प्रस्तावांचा विचार करण्यात येऊन सर्व सदस्यांच्या सहमतीने प्रत्यक्ष पाहाणी करुन मुख्याध्यापक कक्ष आणि वरिष्ठ लिपिक कक्ष यांच्या मधील हॉलकडे असणार्‍या भिंतीवरील मध्यवर्ती जागेची सर्वमान्यतेने निवड करण्यात आली. वरील सभेच्या निर्णयाप्रमाणे डॉ.श्रीधर रघुनाथ लेले यांच्या जन्मदिनी दिनांक १ मार्च २०१६ या दिवशी मा. जनार्दन तेली यांचे शुभहस्ते अर्ध पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या ह्रद्य प्रसंगी मोठ्या संख्येने सभासद आणि ग्रामस्थ हजर होते.

मुटाट गावावर आणि गावकर्‍यांवर निर्लोभ प्रेम करणारे मुटाट गावचे सुपुत्र, मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे आद्य संस्थापक कै. डॉ.श्रीधर रघुनाथ लेले यांच्या अर्ध पुतळ्याचे १ मार्च २०१६ या त्यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून अनावरण करण्यात आले त्या प्रसंगाची क्षणचित्रे.

सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन

मा.खासदार श्री विनायकराव राऊत यांच्या खासदार निधीतून डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलातील सांस्कृतिक भवनास मंजूर झालेल्या निधीतून सांस्कृतिक भवनाच्या पायाभरणाचा भूमिपूजन सोहळा शनिवार दिनांक 19 मार्च 2016 रोजी सायंकाळी 5.30 वाजता मा.खासदार श्री विनायकराव राऊत यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी मा.साळसकर,श्री जगन्नाथ लेले, श्री शामराव लेले,श्री शिवाजी राणे,श्री प्रकाश भेकरे,श्री विजय चिरपुटकर,श्री सिताराम प्रभू, श्री प्रशांत खरबे, श्री मनोहर तेली, मधुकर घाडी,सरपंच श्री किरण प्रभू  यांचेसह मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ आणि पत्रकार उपस्थित होते.

मा.खासदार श्री विनायकराव राऊत यांचे हस्ते खासदार निधीतून डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलसाठी मंजूर झालेल्या सांस्कृतिक भवन इमारतीचे भूमिपूजन: शनिवार दिनांक 19 मार्च 2016:

स्वच्छतागृहांचा आणि हायस्कूल इमारतीच्या ईलेक्ट्रिक  फिटिंगचा शालार्पण कार्यक्रम

दिनांक 28 मार्च 2016 रोजी सकाळी 9.30 वाजता डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल परिसरात विद्यार्थीनींसाठी बांधलेल्या स्वच्छतागृहांचा, पाणी शुध्दिकरण यंत्राचा आणि हायस्कूल इमारतीच्या ईलेक्ट्रिक  फिटिंगचा शालार्पण सोहळा, देणगीदार संस्था मेडिकल अँड एज्युकेशन एड अँक्वा बेनोव्हालंट फंड आणि मेडिकल अँड एज्युकेशन एड बृहन्मुंबई, बी.एम.एल.पी. असोसिएशन यांचे मान्यवर प्रतिनिधीं श्री टी व्ही शहा, श्री एस व्ही खोले, श्री भावेश छोटालिया, श्री बिजल शहा, श्री किशोर मर्चंट आणि श्री धनंजय गणेश परांजपे यांच्या हस्ते, मंडळाचे सभासद, आणि ग्रामस्थ बंधु- भगिनींच्या साक्षीने उत्साहात पार पडला.

देणगीदार संस्था प्रतिनिधींचे मंडळाचेवतीने हार्दिक स्वागत करुन शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यातआला. स्वच्छतागृहांचा शालार्पण सोहळा कार्यकारी समितीचे पदाधिकारी श्री सुभाषचंद्र परांजपे,श्री शिवाजी राणे,श्री अरुण राणे, स्थानिक समिती सदस्य श्री बळवंतराव राणे,शाळा समिती सदस्य,महिला समिती सदस्य,मुटाट संरपंच श्री किरण प्रभू, उप-सरपंच पाळेकरवाडी श्री गोपाळ पाळेकर ,इंजिनिअर नेने आणि गोगटे, अन्य मान्यवर  ग्रामस्थ, डॉ.श्री.र.लेले हायस्कूल आणि स्वयंअर्थसहाय्यित दर्जावाढ कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालायाचे मुख्याध्यापक-प्राचार्य , शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या भरगच्च उपस्थितीत पार पडला.

स्वच्छतागृहांच्या आणि हायस्कूल इमारतीच्या ईलेक्ट्रिक  फिटिंगच्या शालार्पण कार्यक्रमाची क्षणचित्रे: दिनांक 28.03.2016

विध्यार्थिनींसाठी बांधलेल्या नवीन स्वच्छतागृहाचे उद्घाटन

सन २०१६/१७ ते २०१७/१८  या काळात डॉ.श्रीम.हेमलता माधव पुरंदरे (लेले) विद्यासंकुलात केलेल्या विविध विकास कामांची माहिती

    1. डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलातील सांस्कृतिक भवनाचे बांधकाम मा.खासदार श्री विनायकराव राऊत यांच्या खासदार निधीतून मंजूर झालेल्या रु.पाच लाखाच्या निधीत मंडळातर्फे सुमारे तीन लाख पंच्याहत्तर हजाराची भर टाकून पूर्ण झाले आहे.
    2. विद्यार्थी स्वच्छतागृहाचे बांधकाम : दिनांक २८ मार्च २०१६ रोजी डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल परिसरात विद्यार्थीनींसाठी बांधलेल्या स्वच्छतागृहाचा शालार्पण सोहळा पार पाडताना, देणगीदार संस्था मेडिकल अँड एज्युकेशन एड अँक्वा बेनोव्हालंट फंड आणि मेडिकल अँड एज्युकेशन एड बृहन्मुंबई, बी.एम.एल.पी. असोसिएशन यांचे वतीने मान्यवर प्रतिनिधीं श्री धनंजय गणेश परांजपे यांनी विद्यार्थी स्वच्छतागृहाचे बांधकामासाठी निधी जाहीर केला होता त्यानुसार विद्यार्थी स्वच्छतागृहाचे बांधकाम पूर्ण झाले. मंडळाच्या दिनांक ०६.०१.२०१७ रोजी पार पडलेल्या पारितोषिक वितरण समारंभाच्या मुहुर्तावर सन्माननीय पाहुणे राष्ट्रीय आदर्श शिक्षक पारितोषिक विजेते श्री पाटील सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या स्वच्छतागृहांचा शालार्पण सोहळा सभासद आणि ग्रामस्थ बंधु- भगिनींच्या साक्षीने उत्साहात पार पडला.
    3. पोषण आहार किचन शेडचे बांधकामासाठी संस्थेने रु. १लाखाचेवर स्वनिधी खर्च केला असून बांधकाम पूर्ण झाल्याने दिनांक ०६.०१.२०१७  च्या पारितोषिक वितरण समारंभाच्या मुहुर्तावर शेडचा वापर सुरु करण्यात आला.
    4. मोडकळीस आलेल्या अल्पबचत हॉलचे निर्लेखन पूर्ण झाले. या निर्लेखन कामाच्या मंजुरीतून कॉलेज इमारतीकडे जाण्यासाठी सुमारे १२० फूट लांबीचा व्हरांडा पूर्ण करण्यात आला.
    5. मुख्य इमारतीचे प्रवेशद्वार,डॉ. श्री.र.लेले यांचे पुतळ्याखालील  मागील प्रवेशद्वार तसेच कॉलेज इमारतीत जिन्याजवळ सरकती संरक्षक दारे( कोलॅप्सिबल गेट) बसविण्यात आले.
    6. बायोमेट्रीक सिस्टिम आधारीत कर्मचारी हजेरीपत्रक मुटाट येथे कार्यान्वित आहे.
    7. शैक्षणिक वर्ष २०१७-१८ च्या  आरंभापासून दोन डिजटल वर्ग सुरु झाले आहेत.
    8. हायस्कूल आणि कॉलेज इमारत परिसरावर चार सी. सी. टी. व्ही. कॅमेर्‍यांची निगरानी सुरु झाली आहे.
    9. हायस्कूल आणि कॉलेज वर्गांसाठी व्हाईट बोर्ड घेण्यात आले आहेत.
      वरील कामे पूर्ण करण्यासाठी मंडळाने आर्थिक मदतीसाठी मे.अँक्वा बनेव्हलंट फंड, मुंबई यांजकडे अर्जविनंती केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या देणगी निधीतून अनेक कामे पूर्ण करण्यात आली. ट्रस्टचे मान्यवर विश्वस्त/प्रतिनिधी श्री धनंजय गणेश परांजपे आणि त्यांचे सहकारी यांच्या आत्मीयतेबद्दल आणि भरघोस मदतीबद्दल मंडळ कृतज्ञता व्यक्त करीत आहे.

पारितोषिक वितरण समारंभ आणि स्नेहसंमेलन २०१७

मंडळाचा पारितोषिक वितरण समारंभ आणि डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल, कै.भाऊसाहेब काळे भागशाळा आणि सौ.जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य (सं) कनिष्ठ महाविद्दयालयाचे स्नेहसंमेलन दिनांक २२ व २३ डिसेंबर  २०१७  रोजी पार पडले.पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन मा. प्राचार्य डॉ.आर.डी.बेलेकर]आचार्य जावडेकर अध्यापक महाविद्यालय, गारगोटी व संचालक श्री.मौनी विध्यापिठ गारगोटी हे उस्थित होते. त्यांनी विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व पालकांसाठी बहुमोल मार्गदर्शन केले.मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विध्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.
सोहळ्यासाठी मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री विश्वासराव पाळेकर यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांस उपाध्यक्ष श्री. धनंजय परांजपे, श्री.शिवाजी राणे कार्यवाह श्री.सुभाषचंद्र परांजपे आणि इतर पदाधिकारी सर्व श्री रघुनाथ पाळेकर,जितेंद्र साळुके,डॉ.विनय केळकर, सौ. गीता सोवनी आणि सर्व स्थानिक कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम आकर्षक पध्दतीने आणि आनंदी वातावरणात सादर केले. स्नेहसंमेलनांस उपस्थितांनी विध्यार्थ्यांचे कौतुक केले.