सन १९९७-९८ साली मंडळाने मणचे भागशाळेसाठी कायमस्वरुपी इमारत बांधण्यासाठी चाचपणी सुरु केली. अध्यक्ष श्री. रमेशराव घाटे, कार्याध्यक्ष श्री. विश्वासराव पाळेकर, कार्योपाध्यक्ष श्री. मनोहर लेले आणि श्री. कृष्णाजी विठ्ठल लेले यांनी याकामी पुढाकार घेतला. सखोल चर्चेअंती सर्व सोयीनीयुक्त भागशाळा इमारतीचा प्रस्ताव कार्यान्वित करावयाचे ठरले. मणच्यातील मंडळाचे हितचिंतक व कार्यकर्ते श्री. मोरेश्वर अनंत उर्फ बापुसाहेब गोखले, श्री. अरविंद ठाकुरदेसाई, श्री. प्रभाकर मणचेकर, श्री. मुकुंद ठाकुरदेसाई, श्री.तोरसकर, श्री.गजानन सिताराम मेस्त्री, श्री.मंगेश रहाटे व अन्य ग्रामस्थांनी सहकार्याचा हात पुढे केल्याने भागशाळेची संपूर्ण नवी इमारत बांधावयाचा संकल्प जाहीर केला.
