Golden Trust, dedicated for providing Quality Education for the entire Mutat & Surrounding Territory has  celebrated it’s Diamond Jubilee year from May 29,2021 to May 28, 2022.

मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ

Mutat Panchakroshi Shikshan Prasarak Mandal

संचालित
डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल, मुटाट
कै. सौ. जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य (सं.) कनिष्ठ महाविद्यालय,मुटाट
डॉ. श्री. र. लेले हायस्कूलची कै. भाऊसाहेब काळे भागशाळा, मणचे

कार्यगौरव आणि कृतज्ञतास्मरण

हीरक महोत्सवी कार्यगौरव आणि कृतज्ञतास्मरण

          आम्ही, मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारी समितीचे पदाधिकारी आणि सदस्य, सर्व सभासदांच्यावतीने आमच्या सर्व पुर्वसुरींच्या कर्तृत्वाचा, गुणांचा, कार्य समरसतेचा आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाचा आदर करून त्यांच्या मंडळ कार्यातील भरीव योगदानाचा या सन्मानपत्राने कृतज्ञतापूर्वक कार्यगौरव करीत आहोत.

          मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक प्रगतीच्या दमदार वाटचालीत आपण अत्यंत तळमळीने काम करीत असताना व्रतस्थपणे आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या  स्थापनेत, शैक्षणिक प्रगतीत,आपल्या कार्यकाळात आणि कार्यनिवृत्तीनंतरही भरीव योगदान देत आणि संपर्काद्वारे हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा आपण ध्यास घेतला होता/आहे.

        डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल मुटाट, कै.भाऊसाहेब काळे भागशाळा मणचे आणि कै.सौ. जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य (सं) कनिष्ठ महाविद्दयालयाच्या आणि विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी आपल्या जनसंपर्कातून अनेक सुविधा मिळविणे आणि नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा आपला प्रयत्न लक्षवेधी आहे. आपली अविरत काम करण्याची जिद्द, आम्हां सर्वांना  प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारी आहे. आपला विधायक दृष्टीकोन, कर्तृत्व, चिकित्सक वृत्ती, कार्यतत्परता आणि सामाजिक बांधिलकीची जाण अनुकरणीय आणि प्रेरणादायी आहे. आज हीरक महोत्सव सांगता समारोह प्रसंगी हे कार्यगौरव सन्मानपत्र आपणांस आदरपूर्वक अर्पण करताना कृतकृत्य वाटत आहे.              

संस्थापक सदस्य, माजी अध्यक्ष,
डॉ.श्रीधर रघुनाथ लेले, M.Sc. Ph.D.
आंतरराष्ट्रीय किर्तीचे काचतज्ज्ञ

IMG Dr S R LELE

संस्थापक सदस्य,
डॉ. मोरेश्वर जनार्दन बोडस

डॉ.मोरेश्वर जनार्दन बोडस.

माजी अध्यक्ष 
माननीय पुरुषोत्तम गणेश खेर
माजी नगर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य

संस्थापक सदस्य, माजी मुख्य कार्यवाह
माजी उपाध्यक्ष आणि विश्वस्त
मा.श्री विष्णु सखाराम मराठे
ऊर्फ: दादा मराठे

MARATHE

संस्थापक सदस्य आणि माजी मुख्य कार्यवाह
मा. श्री जगन्नाथ दामोदर लेले
ऊर्फ: नाना

DSC_0123

माजी अध्यक्ष
मा.श्री रमेश अच्युत घाटे

GHATE

कै. भिकाजी धोंडो चिरपुटकर
ऊर्फ- बाबासाहेब चिरपुटकर
माजी कार्याध्यक्ष

lgdhpnrb2577_copy_1200x1530

कै. नारायण गणेश परांजपे
माजी उपाध्यक्ष

मा. नारायण गणेश परांजपे

कै. कृष्णाजी विठ्ठल लेले
माजी कार्याध्यक्ष आणि विश्वस्त

KVL

माजी कोषाध्यक्ष, माजी सह कार्यवाह
आणि विद्यमान सल्लागार
माननीय श्री अच्युत अर्जून राणे

achyut-rane

माजी उपाध्यक्ष, माजी कार्योपाध्यक्ष
विद्यमान कार्यकारीणी सदस्य
माननीय श्री मनोहर गोविंद लेले

manohar-lele

आपण आखून  दिलेल्या मार्गावर मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल मुटाट, कै.भाऊसाहेब काळे भागशाळा मणचे आणि कै.सौ. जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य (सं) कनिष्ठ महाविद्दयालयाचे उत्तम संचालन प्रभावीपणे  करण्यासाठी कार्यकारी समिती कटिबध्द आहे.

मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाकरिता

कार्यकारी समिती