उल्लेखनीय उद्देश्यपूर्तीचे यश - कनिष्ठ महाविद्दयालयास शासन मंजुरी:
शासन निर्णय क्र.स्वयं अ/२०१३/८८५/१३ माशि-१ चे सहपत्रान्वये मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळास स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर शैक्षणिक वर्ष २०१३-१४ पासून मुटाट येथे कला व वाणिज्य कनिष्ट महाविद्याल सुरु करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यास अनुसरुन मंडळाने शैक्षणिक वर्ष २०१३-१४ पासून मुटाट येथे सौ. जानकी शिवराम राणे कनिष्ठ महाविद्दयालय सुरु केले आहे. नूतन कनिष्ठ महाविद्दयालयाच्या औपचारिक उद्घाटनाचा सोहळा दिनांक ३ जुलै २०१३ रोजी माननीय श्री रावजी शिवराम राणे उर्फ श्री नाना राणे यांचे हस्ते आणि कार्याध्यक्ष श्री विश्वासराव पाळेकर यांचे अध्यक्षतेखाली उत्साहाच्या वातावरणात पार पडला. इयत्ता ११ वीचे कला आणि वाणिज्य शाखांचे वर्ग सुरु झाले असून दोन्हींची मिळून विद्दयार्थी पटसंख्या ६१ आहे.
उल्लेखनीय उद्देश्यपूर्तीचे यश - कनिष्ठ महाविद्दयालयास शासन मंजुरी:
मंडळाच्या सर्व सभासदांचे हार्दिक पाठबळ, कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम, चिकाटी व कार्यक्षमता आणि सन्माननीय देणगीदारांचे समर्थ आर्थिक पाठबळ यांचे जोरावर मंडळाची आगेकूच सुरु आहे. सन २००४ ते २००६ या वर्षात भाऊसाहेब काळे भागशाळा मणचे येथिल नुतन इमारतीच्या बांधकाम पूर्णत्वानंतर डिसेंबर २००९ मध्ये मुटाट येथील मुख्य हायस्कूल इमारतीच्या बाजूला नवीन इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ झाला.परत एकदा मंडळाचे सर्व कार्यकर्ते झटून कामाला लागले. अल्पस्वल्प देणगी स्वत:पासून जमा करायाला सुरुवात केली आणि हा हा म्हणता कार्यकर्त्यांनी लाखों रुपयांचा निधी बांधकामासाठी जमा केला. या सर्वांच्या समर्थ पाठबळाच्या जोरावर मुटाट येथील नुतन इमारत मार्च २०१२ अखेर बांधून पूर्ण झाली. आजपर्यंत सर्व अडथळे, अडचणी आणि समस्यांवर मात करीत पंचक्रोशीच्या शैक्षणिक विकासासाठी कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्दयालय जुलै २०१३ पासून सुरु केले आहे त्याचा लाभ मुटाट परिसरांतील सर्व विद्दयार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन करुन या विस्तारीत वाटचालीची सांगता करीत आहोत.
- डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल, मुटाट
ता.देवगड, जि. सिंधुदुर्ग: पिन 416803. फोन : ( 02364 ) 247521.
- कै. भाऊसाहेब काळे भागशाळा, मणचे,
ता.देवगड, जि. सिंधुदुर्ग: पिन 416803. फोन : ( 02364 ) 247521.
- कै. सौ. जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, मुटाट,
ता.देवगड, जि. सिंधुदुर्ग: पिन 416803. फोन : ( 02364 ) 247521.