Golden Trust, dedicated for providing Quality Education for the entire Mutat & Surrounding Territory has  celebrated it’s Diamond Jubilee year from May 29,2021 to May 28, 2022.

मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ

Mutat Panchakroshi Shikshan Prasarak Mandal

संचालित
डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल, मुटाट
कै. सौ. जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य (सं.) कनिष्ठ महाविद्यालय,मुटाट
डॉ. श्री. र. लेले हायस्कूलची कै. भाऊसाहेब काळे भागशाळा, मणचे

संस्थेचे दाते

संस्थेची स्थापना करण्यासाठी......

डॉ. श्रीधर रघुनाथ लेले यांचा पाठिंबा मिळणार म्हटल्यावर संस्थेची स्थापना करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. या कामी ज्या प्रमुख व्यक्तींनी विषेश खटपट केली त्यांचा नामोल्लेख करणे हे आमचे कर्तव्य आहे असे आम्ही मानतो.त्या व्यक्ती अशा:-

शाळेसाठी जमीन :

शाळेसाठी स्वतंत्र इमारत बांधण्याचा निर्णय झाल्यानंतर इमारतीसाठी प्रशस्त व गावाच्या मध्यवर्ती ठिकाणच्या जागेची शोधाशोध सुरु झाली. शिक्षणाची निकड व त्याचे महत्व जाणून आज ज्या जागेवर हायस्कूलची मुख्य इमारत उभी आहे ती सुमारे २ एकर २८ गुंठे एवढ्या क्षेत्राची उत्तम पिकाऊ भातशेतीची जमीन, ती जमीन कसण्या-या:

स्वखुशीने शाळेच्या इमारतीसाठी दिली. घाडी आणि साळुंके शेतकरी बांधवांचा तसेच जमीनचे मालक श्री गणूकाका परांजपे आणि प्रभू यांचा त्याग मंडळासाठी अनमोल आहे.

शाळेसाठी स्वतंत्र इमारत:

मुंबईच्या एका प्रख्यात कंत्राटदारावर बांधकामाची जबाबदारी सोपविण्यात आली.बांधकाम साहित्य, मजूर, यंत्रसामुग्री वगैरे मुंबईहून रवाना झाली.

निधी संकलानाच्या दोन मोहिमा मंडळाने काढल्या:

तारीख १४ एप्रिल १९६४ ला चौपाटी जवळील भारतीय विद्याभवनमध्ये संगीत संशयकल्लोळ या संकृत नाटकाचा बहारदार प्रयोग गिरगांवच्या ब्राह्मण सभेने केला. या वेळी एक स्मरणिका प्रकाशित केली.नाटकाची तिकिट विक्री व जाहिरातीमधून खर्च वजा जाता मंडळाला सुमारे रु.४४,०००/- ची रक्कम मिळाली.

त्यानंतर पुन्हा एकदा तारीख १७ एप्रिल १९६६ ला स्मरणिका प्रकाशन व संगीतभूषण श्री. राम मराठे यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम झाला.हा कार्यक्रम दादरच्या बालमोहन विद्दा मंदिराच्या हॉलमध्ये विनाशुल्क करण्यात आला. जाहिरातदार, देणगीदार व संगीतप्रेमी मंडळी या समारंभाला बहुसंख्येने आली होती.स्मरणिकेच्या या उपक्रमातून खर्च वजा जाता मंडळाला सुमारे रु.२७,०००/- मिळाले.

जो काही लाखभराचा निधी मंडळाने गोळा केला तो गोळा करण्यात 

 

इमारत निधीसाठी:

स्मरणिका:

स्मरणिकेतील जाहिरातीव्दारा छपाई खर्च वजा जाता सुमारे ४२,७५५ रुपयांचा बांधकाम निधी गोळा झाला.