शासन निर्णय क्र.स्वयं अ/२०१३/८८५/१३ माशि-१ चे सहपत्रान्वये मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळास स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर शैक्षणिक वर्ष २०१३-१४ पासून मुटाट येथे कला व वाणिज्य कनिष्ट महाविद्याल सुरु करण्यास मंजुरी मिळाली. त्यानुसार मंडळाने शैक्षणिक वर्ष २०१३-१४ पासून मुटाट येथे डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल- स्वयंअर्थसहाय्यित दर्जावाढ कला व वाणिज्य (सं) कनिष्ठ महाविद्दयालय (सौ. जानकी शिवराम राणे कनिष्ठ महाविद्दयालय) सुरु केले. नूतन कनिष्ठ महाविद्दयालयाच्या औपचारिक उद्घाटनाचा सोहळा दिनांक ३ जुलै २०१३ रोजी माननीय श्री रावजी शिवराम राणे उर्फ श्री नाना राणे यांचे शुभहस्ते आणि कार्याध्यक्ष श्री विश्वासराव पाळेकर यांचे अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला.
या समारंभास सेवानिवृत्त आयकर सह आयुक्त श्री विजय पांगम यांची सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली.
इयत्ता ११ वीचे कला आणि वाणिज्य शाखांचे प्रथम वर्ग ६१ विद्दयार्थी पटसंख्येने सुरु झाले.