मुटाट जवळच्या मणचे गावांत गावकर्यांनी विनंती केल्यावरून सन १९८४-८५ वर्षापासून मंडळाने डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूलची भागशाळा सुरु केली. भागशाळेचे इयत्ता ८ वी, ९ वी आणि दहावीचा वर्ग अशा क्रमाने इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वी पर्यंतचे वर्ग सुरु झाले. सन १९८६-८७ मध्ये तीनही वर्गांची मिळुन विद्यार्थी संख्या १४० होती.
भागशाळेचे वर्ग ग्रामपंचायतीने गावांतील श्रीकृष्ण मंदिराच्या धर्मशाळेत दिलेल्या जागेत भरत होते. भागशाळेसाठी त्या वेळचे सरपंच श्री. बापूसाहेब गोखले यांनी पुढाकार घेवून विशेष प्रयत्न केले. माजी आमदार श्री. अमृतराव (दादासाहेब) राणे यांनी या भागशाळेसाठी शिक्षण खात्याकडून त्वरीत परवानगी मिळवून दिली