मुटाटला कनिष्ट महाविद्यालय सुरु करावयाचे म्हटल्यावर सारे पदाधिकारी व कार्यकार्ते उत्साहाने कामास लागले. कनिष्ट महाविद्दयालयासाठी सुसज्ज जागा, त्याचबरोबर संगणक प्रशिक्षण, तांत्रिक अभ्यासक्रम , हायस्कूलची वाढती विद्दयार्थी संख्या आणि भविष्यातील सर्वांगीण वाढ विचारात घेऊन हायस्कूल इमारतीच्या दक्षिणेला इमारतीला जोडून आठ खोल्यांची एक मजली इमारत बांधण्याचे ठरले.
इमारतीच्या आराखडयाच्या शासकीय मान्यतेनंतर रविवार दिनांक ४ जानेवारी २००९ रोजी मंडळाचे अध्यक्ष श्री. रमेशराव घाटे , कार्याध्यक्ष श्री. विश्वासराव पाळेकर, उपाध्यक्ष श्री. मनोहरपंत लेले यांचे उपस्थितीत विश्वस्त व उपाध्यक्ष श्री. विष्णु सखाराम मराठे व मुख्यकार्यवाह श्री. जगन्नाथ दामोदर लेले यांचे शुभहस्ते भूमीपूजनाचा सोहळा पार पडला. भूमीपूजन सोहळ्याचे पौरोहित्य आदरणीय श्री विनुभाऊ मराठे यांनी केले.या सोहळ्यास सर्वश्री शिवाजी राणे,राजेश राणे,अच्युतराव राणे,सदानंद पाळेकर,विठोबा प्रभु,सुभाषचंद्र परांजपे,सुरेश पाळेकर,सुरेश रायकर यांचेसह स्थानिक समितीचे सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
नियोजित बांधकामासाठी श्री सुरेश रायकर यांना कंत्राट देण्यात आले. दिनांक २७ दिसेंबर २००९ या दिवशी सकाळी ९ वाजता श्री रावजी शिवराम राणे उर्फ नाना राणे,अध्यक्ष श्री रमेश घाटे,कार्याध्यक्ष श्री विश्वासराव पाळेकर, उपाध्यक्ष श्री मनोहर लेले यांचे शुभहस्ते कोनशिला बसविण्यात येऊन बांधकामाचा शुभारंभ झाला.
या संस्मरणीय सोहळ्यास कार्यकारी समितीचे पदाधिकारी श्री शिवाजी राणे,श्री विनायक लेले,श्री राजेश राणे,श्री जितेंद्र साळुंके यांचेसह मुंबईहून आलेल्या पाहुण्यांची सन्माननीय उपस्थिती लाभली. स्थानिक समितीचे श्री अच्युत राणे,श्री सुभाषचंद्र परांजपे,श्री सदानंद पाळेकर,श्री सुरेश पाळेकर,श्री विठोबा प्रभु, देवगड पंचायत समिती सदस्य श्री बाळकृष्ण पाळेकर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य श्री जनार्दन तेली, स्थानिक समिती सभासद, प्रमुख ग्रामस्थ व अन्य प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत कोनशीलान्यास आणि बांधकाम शुभारंभाचा संस्मरणीय सोहळा पार पडला
बांधकाम शुभारंभ सोहळ्याप्रसंगी आमच्या आवहनाला प्रतिसाद देत श्री मनोहर गोविंद लेले आणि कुटुंबीय, श्री रमेश अच्युत घाटे आणि कुटुंबीय, श्री यशवंत केशव लेले, श्री विनायक कृष्णाजी लेले आणि कुटुंबीय, सौ सुशीला व श्री नारायण गणेश परांजपे आणि कुटुंबीय, श्री बळवंत शिवराम राणे आणि कुटुंबीय, श्री विवेक विष्णु केळकर आणि कुटुंबीय, श्री अभिजित राणे मित्रमंडळ आणि माजी विद्यार्थी संघ यांचेकडून प्रमुख देणग्या प्राप्त झाल्या. कनिष्ठ महाविद्यालय इमारतीचे बांधकाम मार्च २०१२ अखेर पूर्ण झाले.